शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आरपीएफची खंडणीखोरी, प्रवाशांचा घेराव

By admin | Updated: July 6, 2016 02:26 IST

पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानका जवळ सोमवारी पहाटे मालगाडीचे ११ डबे घसरल्याने बंद पडलेली वाहतूक मंगळवारी सकाळपर्यंत पूर्ववत करण्यासाठी एकीकडे रेल्वे काटेकोर

- हितेन नाईक , पालघर

पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानका जवळ सोमवारी पहाटे मालगाडीचे ११ डबे घसरल्याने बंद पडलेली वाहतूक मंगळवारी सकाळपर्यंत पूर्ववत करण्यासाठी एकीकडे रेल्वे काटेकोर प्रयत्न करीत होती. तर दुसरीकडे लांब पल्ल्याचा गाडयातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आरपीएफ जबरदस्तीने पैसे उकळत असल्याच्या निषेधार्थ प्रवाशांना पहाटे पालघरच्या स्टेशन मास्टरला घेराव घालावा लागला.काल सोमवारी पहाटे डहाणू आणि वाणगाव दरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने, रेल्वे रूळ उखडले, व ओव्हरहेड वायर तुटली, सिग्नल तुटले यामुळे मुंबईकडे येणाऱ्या व मुंबईहून दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी जणाऱ्या गाडया तब्बल १२ ते १८ तास रखडल्या, रेल्वे प्रशासनाच्या अथक प्रयत्ना नंतर मुंबई कडील अप लाईन सुरु करण्यात यश आले असले तरी डाऊन लाईन वरून सोडण्यात येणारी सेवा सुरु करण्यासाठी आज ११ वाजले. मुंबई येथून पहिली दूरांतो निजामुद्दीन एक्सप्रेस गाडी गुजरातच्या दिशेने रवाना झाली. मुंबईहून डाऊन लाईनवरून सोडण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाडयामधून प्रवास करण्याची मुभा रेल्वेने दिली असतांना त्या प्रवाशांना बेकायदा प्रवासी ठरवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याने आज पहाटे ३.४५ वाजता गुजरात मेल डाऊन गाडीतील प्रवाशानी पालघरच्या स्टेशन मास्टरला घेराव घातला. अखेर असे कोणतेही कृत्य आरपीएफने करू नये, अन्यथा त्याच्या विरोधात कारवाईचा अहवाल पाठविण्यात येईल असे जाहीर केल्या नंतरच प्रवाशांनी आपला घेराव संपुष्टात आणला. डहाणू जवळचा उखडलेला ट्रॅक दुरु स्त करण्याचे काम सुरु असले तरी त्या साठी अद्यापही काही कालावधी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे डहाणू ते वाणगाव लूप लाईन वरून गाड्या काढण्यात येत असल्याने दोन्ही बाजू कडील गाडयाना उशीर होत आहे. सुरत शटल, डहाणू बोरिवली लोकल, अहमदाबाद पॅसेंजर, डहाणू विरार शटल, पनवेल मेमू आदी गाडया रद्द करण्यांत आल्या होत्या. त्या वेळापत्रकानुसार कधी धावतील? हे मात्र रेल्वेला दोन दिवसांनंतरच सांगता येणार आहे. कारण झालेल्या दुरुस्तीची सुरक्षा चाचणी झाल्यानंतरच तिचा वापर होणार आहे. सगळ्याच प्रवाशांची झाली प्रदीर्घ काळ कोंडी सोमवारी रात्री साडे दहा वाजल्यापासून मुंबईहून सुटलेल्या अनेक लांब पल्ल्याच्या गाडया विरार ते बोईसरपर्यंतच्या विविध रेल्वे स्थानकात पहाटे पाच वाजेपर्यंत अडकून पडल्याने तसेच अनिश्चित काळा पर्यंत गाडया थांबल्याने प्रवाशांच्या हालांना पारावर नसल्याने प्रवाशानी आंदोलने केली. पश्चिम रेल्वेवरील सर्वच लांब पल्ल्याच्या गाडयांच्या वेळा अनिश्चित असून बोईसर ते विरार दरम्यानच्या प्रवेशासाठी केवळ दोन लोकल सुरु आहेत, तर मंत्रालय व मुंबई महानगर पालिका आणि बँका आदी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी खास असलेली बलसाड तेज पॅसेंजर रद्द आहे.