शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यातील खड्ड्यांना मातीची मलमपट्टी

By admin | Updated: August 8, 2015 21:51 IST

डहाणू-बोर्डी सागरी मार्गावर खड््यांचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबर खडी मिश्रणाने ते बुजवण्या पेक्षा मातीची मलमपट्टी करण्यात धन्यता मानली

बोर्डी : दि. ०७ (वार्ताहर) डहाणू-बोर्डी सागरी मार्गावर खड््यांचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबर खडी मिश्रणाने ते बुजवण्या पेक्षा मातीची मलमपट्टी करण्यात धन्यता मानली आहे. पावसाळी वातावरणात त्यातील माती बाहेर निघून रस्ता चिकट झाल्याने, ये- जा करणाऱ्या दुचाकी स्वारांना बे्रक न लागल्याने अपघातांना सामोरे जावे लागत आहे.या मार्गावरील नरपड मांगेल आळीनजीक रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. चिखले बर्वेवाडी येथील मोरी भगदाड पडण्याच्या स्थितीत आहे. मरबाडा, टोकेबीज या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. घोलवड या राष्ट्रीय दर्जा प्राप्त गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची स्थिती अधिकच दयनीय आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे आदी महत्वाच्या कार्यालयासमोर अर्धाफूट खोलीचे खड्डे पडल्याने संबंधीत कार्यालयात विविध समस्यांचे निराकरणाकरीता येणाऱ्या नागरीकांच्या त्रासात अधिकची भर पडते. अशा रस्त्यांमुळे महिलांनी गर्भपात व अवेळी प्रसूतीची भीती व्यक्त केली असून, एस.टी, रिक्षा, मालवाहू वाहनांचे चालक, दुचाक ीस्वार, आणि पादचाऱ्यांना अपघाताचे भय सतावते आहे. बोर्डी खुटखाडी पुलाचा संरक्षक कठडा तुटला आहे. तर बोरीगाव घाटातील मार्ग धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात डोंगरउतारावरून पाणी व चिखल रस्त्यावर जमा होतो. त्यात रस्त्यालगत पाणी निचरा करणारी मार्गीका नसल्याने दोन्ही बाजूला पाण्याचे ओहळ असतात.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील असून, डहाणू, तलासरी कार्यालयांतर्गत येतो. दरवर्षी प्रमाणे डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांना बुजविण्याकरीता मातीचा भराव घालण्यात आला. मात्र पाऊस आणि वाहतुकीची रहदारी यामुळे परिस्थिती जैसे थे झाली आहे. डांबरी रस्त्यावरील खड्डे मातीच्या भरावाने बुजत असतील तर कोट्यावधींचा खर्च करण्याची गरज काय? अशी टीका होत आहे. (वार्ताहर)