शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक रस्त्यावर पार्किंग करून लूटमार

By admin | Updated: September 8, 2016 02:16 IST

पापडी येथील दत्तानी मॉलने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पे अ‍ॅॅण्ड पार्क सुरू केल्याचे उजेडात आले आहे

वसई : पापडी येथील दत्तानी मॉलने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पे अ‍ॅॅण्ड पार्क सुरू केल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर वसई-विरार पालिकेने दत्तानी मॉलला सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीसाठी मोकळ्या करून स्वतंत्र पार्किंगची सुविधा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. वसईतील पापडी येथील दत्तानी मॉल आता पार्किंगच्या वादात सापडला आहे. या ठिकाणच्या मंजूर आराखड्यात मॉलशेजारील रस्ता सार्वजनिक वापरासाठी आरक्षित आहे. असे असताना मॉलच्या व्यवस्थापनाने रस्ता अडवून गेट लावून टाकले. त्यानंतर त्या ठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्क तयार केले. गेल्या तीन वर्षांपासून सार्वजनिक रस्ता गिळंकृत करून मॉलकडून गाड्या पार्किंगसाठी शुल्क आकारले जात असल्याची बाब काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड. जिमी घोन्सालवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर त्यांनी महापालिकेला रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी नगररचना विभागाने मॉल व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. सदरचे वाहनतळ अनधिकृत असून ते तत्काळ बंद करण्यात यावे. तसेच मंजूर नकाशानुसार वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. हे प्रकरण म्हणजे रस्त्याची जागा हडप करण्याचा प्रकार आहे. (प्रतिनिधी)