शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल ग्राहकांची लूट पालघरला उघडकीस

By admin | Updated: September 3, 2015 23:11 IST

पालघरच्या गणेशकुंडाजवळील भारत पेट्रोलियमच्या सी.टी. पारीख पेट्रोलपंपावर रिडींगवर दाखविलेल्या लिटरपेक्षा कमी पेट्रोल दिले जात असल्याची फसवेगिरी लोकमतने उघडकीस आणली

पालघर : पालघरच्या गणेशकुंडाजवळील भारत पेट्रोलियमच्या सी.टी. पारीख पेट्रोलपंपावर रिडींगवर दाखविलेल्या लिटरपेक्षा कमी पेट्रोल दिले जात असल्याची फसवेगिरी लोकमतने उघडकीस आणली असून पुरवठा अधिकाऱ्यांनी हा पेट्रोलपंप तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.पालघरच्या सी.टी. पारीख पेट्रोलपंपामधून ग्राहकांनी मोजलेल्या दामापेक्षा कमी व रॉकेलमिश्रित पेट्रोल दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारी दुपारी लोकमतचे वार्ताहर आरीफ पटेल यांनी दोन मोटारसायकली पेट्रोल भरण्यासाठी पाठवल्या. त्याप्रमाणे देवराम वायडा, रा. करळगाव (मनोर) व पिंटू वर्मा, रा. मस्तान नाका यांनी आपल्या मोटारसायकलींमध्ये अनुक्रमे ४०० रु.चे ६.१२ लीटर्स आणि ५०० रु.चे ७.६६ लीटर्स पेट्रोल टाकून त्याच्या पावत्याही घेतल्या. त्यानंतर, पेट्रोलपंप कार्यालयातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दोन्ही गाडीतील पेट्रोल नळीद्वारे बाहेर काढून मोजले असता अवघे चार लीटर पेट्रोल निघाले. या फसवाफसवीचे वृत्त जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी जिल्हाधिकारी राजेश काटकर, जिल्हापुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांच्या कानी घातल्यानंतर तपासाची चक्रे हलली. तालुका पुरवठा अधिकारी संभाजी पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता प्रथमदर्शनी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांपेक्षा कमी पेट्रोल दिले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. याच वेळी वैध मापन परिमाण विभागाकडून प्रमाणित करून दिलेल्या पेट्रोल भरण्याच्या मापन यंत्रात फेरफार करून कमी पेट्रोल देण्याचे सेटिंग करून ठेवल्याचे दिसून आले. याबाबत तालुका वैध मापन परिमाण निरीक्षक महेंद्र सुखसे यांना माहिती दिली असता कळविले. ते उशिरा आले आणि पेट्रोल वितरण व्यवस्थेत कुठलाही दोष नसल्याचे सांगून पेट्रोलपंपमालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)