शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याला भोवला दरोडा, दहा आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 00:53 IST

पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांना निलंबित करण्यात आले असून या दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांच्याकडे चौकशी सुपूर्द करण्यात आली आहे.

पालघर : सफाळे परिसरातील बड्या नेत्याच्या कोलंबी प्रकल्पातील कोळंबी चोरी प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांना निलंबित करण्यात आले असून या दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांच्याकडे चौकशी सुपूर्द करण्यात आली आहे.सफाळेच्या पश्चिमेकडील समुद्रालगतच्या खार्डी, जलसार, टेभिखोडावे, वेढी, विलंगी, डोंगरे, चिखलपाडा आदी भागासह माहीम, केळवे येथील कांदळवन क्षेत्रालगत काही भागांत उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. रोहित पवार यांचे नातेवाईक आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नचिकेत पाटील, अण्णा पाटील आदी बड्या नेत्यांसह काही स्थानिकांनी शासनाकडून भाडेपट्ट्यावर (लीजवर) १०० ते ६०० हेक्टर क्षेत्रफळाच्या जमिनी घेतल्या आहेत.या खारटण जमिनीवर सन १९९०-९२ सालापासून मोठमोठे कोळंबी प्रकल्प उभारण्यात आले असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून केली जाते.सफाळे परिसरातील काही कोळंबी प्रकल्पातून परिसरातील काही लोक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुरक्षा रक्षकांना मारहाण करून प्रकल्पातील कोळंबी चोरून नेत असल्याच्या तक्रारी मागील १५-२० वर्षांपासून संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या आहेत. २० जून रोजी जलसारच्या कोलंबी प्रकल्पातून कोलंबी चोरल्याप्रकरणी अनंत पाटील, तर खर्डी येथील प्रकल्पातून चोरी केल्या प्रकरणी राहुल जगताप यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.या दोन्ही कोळंबी प्रकल्पाच्या पॉडमधील पाणी बाहेर काढून कोलंबी काढीत असताना जलसार, टेम्भीखोडावे आदी परिसरातील सुमारे १२५ महिला, पुरुषांनी एकत्र येत जबरदस्तीने घुसून ३०० ते ४०० किलो वजनाची कोलंबी चोरून नेल्याच्या फिर्यादी नोंदविण्यात आल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत ही चोरी होत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोतून दिसून येत होती.या चोरीसंदर्भात अनेक तक्रारी होऊनही चोरांवर ठोस कारवाई होत नसल्याने वरिष्ठ पातळीवरून मोठा राजकीय दबाव निर्माण होत केळवे सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि नरवडे यांना पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी तात्काळ निलंबित केले आहे. त्यांच्या जागी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख असलेल्या मानसिंग पाटील यांची नियुक्ती केल्यानंतर आतापर्यंत १० आरोपीना अटक करण्यात आली आहे.सफाळे पोलीस ठाण्यातआपली यशस्वी कारकीर्द गाजविणाºया अधिकाऱ्यांच्या हातात या प्रकरणाचा तपास सोपविल्याने अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही चोरीची साखळी सपोनि पाटील खंडित करतील, असा आशावाद या निमित्ताने कोलंबी प्रकल्पधारक व्यक्त करीत आहेत.>स्थानिक प्रकल्पधारक : देतात परवानगीकोलंबी प्रकल्पातील पॉडमधील कोलंबी काढल्यानंतर खाली उरलेल्या चिखलातील कोलंब्या, खेकडे, निवट्या, खरबी आदी मासे स्थानिकांना नेण्याची परवानगी काही स्थानिक प्रकल्पधारक देत असतात.मात्र, २० जूनच्या घटनेत सर्व कोलंबी काढण्याआधीच लोकांनी पॉडमध्ये शिरून सुमारे ८० हजार किमतीची ३०० ते ४०० किलो कोलंबी चोरण्याच्या उद्देशाने दरोडा घातल्याची नोंद करण्यात आला आहे.या कोलंबीची खरेदी स्थानिक ग्रामस्थही करीत असून लॉकडाऊन काळात स्थानिकांना यातून चांगले उत्पन्न मिळाले. पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता हा व्यवसाय मागील ३० वर्षांपासून सुरू असून अनेक स्थानिकांचा आम्हाला पाठिंबा आहे.- अजितसिंह पाटील, पंचम प्रकल्प जलसारचे मालक