शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये रोडरोमिओंचा उच्छाद

By admin | Updated: August 26, 2015 23:46 IST

जव्हार शहरात सध्या रोडरोमिओंच्या उच्छादामुळे शाळा तसेच कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण असून पालकवर्ग चिंतेत आहे. शहरात भारती विद्यापीठ

जव्हार : जव्हार शहरात सध्या रोडरोमिओंच्या उच्छादामुळे शाळा तसेच कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण असून पालकवर्ग चिंतेत आहे. शहरात भारती विद्यापीठ व गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. यामध्ये शहरातील तसेच ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या प्रकाराकडे पोलीस लक्ष देत नसल्याने विद्यार्थिनी शाळा तसेच कॉलेज सोडण्याच्या मन:स्थितीत आहे. या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.शाळा तसेच कॉलेज भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेस हे रोडरोमिओ टोळक्याने मोटारसायकलवर तोंडाला रूमाल बांधून घिरट्या घालतात. विरळ लोकवस्ती असलेल्या ठिकाणी, पानटपऱ्यांवर, चौकात उभेच असतात. विद्यार्थिनी येताच शेरेबाजी करणे, शिट्या मारणे, अश्लील गाणे म्हणणे असे प्रकार करतात. अनेक विद्यार्थिनी भीतीने पालकांना या गोष्टी सांगत नाहीत. ज्या सांगतात, त्यांचे पालक बदनामी नको म्हणून पोलीस स्टेशनची पायरी चढत नाहीत. याचाच गैरफायदा हे रोडरोमिओ घेतात. हे सर्व प्रकार शाळा व कॉलेजच्या कॅम्पसबाहेर घडत असल्याने तेथील प्राचार्य, प्राध्यापक यांना याबाबत काहीही कारवाई करता येत नाही.शहरातीलच एका विद्यार्थिनीने छेडछाडीच्या प्रकरणामुळे शाळेत जाणे सोडून दिले. तसेच तिने वार्षिक परीक्षादेखील न दिल्याने तिच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल तिच्या पालकांनी केला. आजदेखील अनेक विद्यार्थिनी शाळेत जाण्यास घाबरत असल्याने त्यांचे वडील त्यांना शाळेत सोडण्यासाठी व आणण्यासाठी जातात. याबाबत, छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलताच गावातीलच अनेक राजकीय पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे रोडरोमिओंना पाठीशी घालण्याचे व त्यांना सोडून द्या, प्रकरण आपापसांत मिटवून टाकण्याचे धोरण असल्याने या रोडरोमिओंना धाक राहिला नसून ते निर्ढावल्याचे पालकांनी सांगितले.छेडछाडीच्या अनेक तक्रारी पालकांनी तोंडी केल्या आहेत. त्या-त्या वेळी आम्ही तत्काळ दखल घेतली. आता या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी दोन महिला व दोन पुरुष पोलिसांचे स्क्वॉड तयार करून विद्यार्थिनी तसेच महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर पाळत ठेवून कडक कारवाई करू.- केशवराव नाईक, पोलीस निरीक्षक, जव्हार