शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुडूस-कोंढला रस्ता मृत्यूचा सापळा

By admin | Updated: August 8, 2015 21:44 IST

येथील रहदारीचा प्रमुख रस्ता असलेल्या कुडूस-कोंढला या मार्गावर जून महिन्यापासून अनेक अपघात झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात उद्योग

वाडा : येथील रहदारीचा प्रमुख रस्ता असलेल्या कुडूस-कोंढला या मार्गावर जून महिन्यापासून अनेक अपघात झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात उद्योग असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होत असल्याने येथे नेहमी वाहनांची कोंडी होते. डागडुजीनंतर हा मार्ग लगेच उखडल्याने ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमान सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि. १०) पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे तहसीलदारांना देण्यात आला आहे.कुडूस-कोंढला हा १० किमीचा रस्ता असून या रस्त्यासाठी शासनाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत ४ कोटी ८३ लाख इतका निधी मंजूर केला होता. या रस्त्याचा ठेका गजानन कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आला होता. ठेकेदाराने हे काम वाड्यातील एका पोटठेकेदाराला दिले होते. त्याने आॅक्टोबरनंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. काम निकृष्ट दर्जाचे केले. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते न झाल्याने त्याने पावसाळा सुरू होताच काम अपूर्णावस्थेतच सोडल्याने मातीभरावामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरला आहे. मुख्य रहदारीच्या मार्गाची अशी दुरावस्था झाल्याने वाहने फसणे, दुचाकी घसरणे, सायकलस्वार पडणे अशा अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. या शिवाय वाहनांचे नुकसान सतत होत असते. (वार्ताहर)