शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वाडा तालुक्यातील रस्त्यांची चाळण

By admin | Updated: June 2, 2016 01:14 IST

तालुक्यात डी प्लस झोन जाहीर होऊन सन १९९२ पासून खेडोपाडी अनेक लहान मोठे उद्योग स्थिरावल्यानंतर तालुक्यातील मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे गेल्या

वाडा : तालुक्यात डी प्लस झोन जाहीर होऊन सन १९९२ पासून खेडोपाडी अनेक लहान मोठे उद्योग स्थिरावल्यानंतर तालुक्यातील मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे गेल्या २४ वर्षांत गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे जड वाहनांची वर्दळ असलेल्या अंतर्गत रस्त्याची चाळण होवून वाताहात झाली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालक वयोवृद्ध पादचारी त्यामुळे मेटाकुटीला आले आहेत. ३१ मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली होती. परंतु हे फक्त दिवास्वप्न ठरले आहे. स्वातंत्र्यानंतर गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला मात्र आपले राज्यकर्ते या संदेशाचा दुसरा अर्थ म्हणजे खड्यातून चाला असा देत आहेत. तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांपैकी विशेषत: कुडूस-चिंचघर ते विजयगड व चिंचघर- बुधावली ते देवघर गौरापूर या एकूण १५ कि. मी. लांबीच्या रस्त्यावर प्रत्येक दिवशी साधारण १४ हजार मेट्रिक टन वाहतूक होत असते तर कुडूस कोंढला खैरे आंबिवली आणि सापरोंडे - उचाट या एकूण १२ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर २० हजार मेट्रिक टन वाहतूक रोजची असते.याचबरोबर मेट-घोणसई, डाकिवली-केळठण-निबंवली, या रस्त्याचीही अवस्था दयनीय झाली आहे. अशी प्रतिक्रिया प्रा. धनंजय पष्टे यांनी दिली आहे. योग्य क्षमतेचे मजबुतीकरण न झालेले आणि अगोदरच अरूंद असलेले रस्ते खड्डयामुळे धोकादायक बनले आहेत. खड्डयामुळे होणाऱ्या पाठदुखी, कंबरदुखी सारख्या विकाराने वाहनचालक हैराण झाले आहेत. तर , दुचाकीस्वार , महिला, वृध्द पडून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण हा कायद्याने हा गुन्हा आहे. संबंधित प्रशासना विरोधात जनहीत याचिकेच्या स्वरूपात फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो. (वार्ताहर)