शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमधील खड्डे बुजवण्यासाठी आर.एम.सी. तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:44 IST

फेब्रुवारी, मार्च व मे महिन्यात बांधलेल्या डांबरी रस्त्यांची पुरती धुळधाण झाल्याने वसई विरार महानगरपालिकेने प्रथमच आर.एम.सी म्हणजेच ( रेडी मिक्स काँक्र ीट ) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे.

वसई : फेब्रुवारी, मार्च व मे महिन्यात बांधलेल्या डांबरी रस्त्यांची पुरती धुळधाण झाल्याने वसई विरार महानगरपालिकेने प्रथमच आर.एम.सी म्हणजेच ( रेडी मिक्स काँक्र ीट ) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे. यामुळे गत काळात नागरिकांचे होणारे हाल पुढील काळात होणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या पूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी खडी व ग्रिट पावडरच्या मिश्रणाचा वापर होत होता. मात्र हा फार्मुला पावसाच्या रिपरिपी पुढे टिकत नव्हता. काही दिवसातच ही मलमपट्टी उघडी पडत असल्याने महानगरपालिका प्रशासनाला होणाऱ्या टिके पूढे निरुत्तर व्हावे लागत होते. तसेच या मलमपट्टीवर आतापर्यंत कोट्यवधी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यासारखी स्थिती आहे.वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नालासोपारा येथील संतोष भुवन, विरार इस्ट येथील चंदन सार, विरार पूर्व व पश्चिमेला जोडणारा फाटक रोड , तुळींज आदी भागात रस्त्यांची दुरावस्था असून संपूर्ण शहराचा विचार करता २५० खड्ड्यांची नोंद असून त्यातील ४० खड्डे गंभीर आहेत. दरम्यान, विरार महापालिकेने यंदा प्रथमच आर.एम.सी च्या तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे. त्यातील तयार सिमेंट हे घट्ट असून ते लगेच खड्ड्याला घट्ट पकडून राहते. त्यामुळे पाऊस किती ही झाला तरी त्या बुजवलेल्या खड्डयावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही.आर.एम.सी तंत्रज्ञाननक्कीच उजवं ठरेल !डांबरीकरण करण्यासाठी किमान सहा ते आठ तासांचा कालावधी लागतो. त्यासाठी पावसाची उघडीप लागते. परंतु मोठा पाऊस आला की, ते काम वाया जाऊन वेळ आणि आर्थिक नुकसान होते. त्यामुळे भविष्यात हे नवं आर एम सी तंत्रज्ञान नक्कीच उजवं ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार