शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पालघर जिल्ह्यातील रिक्षा बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:50 IST

पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांची पालघर येथे होणारी ‘पासिंग’ आता विरार येथे नेऊन नंतर ती सुमारे सव्वाशे किमी लांब असणा-या कल्याण येथे हलवली जाणार आहे.

हितेन नाईक/शशी करपेपालघर/वसई : पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांची पालघर येथे होणारी ‘पासिंग’ आता विरार येथे नेऊन नंतर ती सुमारे सव्वाशे किमी लांब असणा-या कल्याण येथे हलवली जाणार आहे. अत्यंत खर्चिक, त्रासदायक ठरणारे कल्याण हे ठिकाण बदलून पुन्हा ती पालघरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो रिक्षाधारकांनी शुक्र वार पासून बेमुदत बंद पुकारला आहे.ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्या नंतर सर्व विभागांची कार्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर मुख्यालयात सुरू करणे गरजेचे असताना ते विरार येथे सुरू करण्यात आले. परिवहन विभागाने ही आपल्याला पालघर मुख्यालयात कार्यालय व इतर पासिंग चाचणीच्या प्रक्रियेसाठी जागेची मागणीच केली नसल्याने शासन पातळी वरून त्याबाबत विचार करण्यात आलेला नसल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे.पालघर पूर्वेला असलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये असलेल्या जागेत मागील २०-२५ वर्षांपासून तीन-सहा आसनी रिक्षा, मोटार -सायकल, टेम्पो, ट्रक आदी गाड्यांची पासिंग प्रक्रिया केली जात होती. ती आता बंद करून डहाणू पासून सुमारे ९२ किमी तर पालघर पासून ५५ ते ६० किमी अंतरावरील विरार येथे नेऊन ठेवण्यात आली होती. रिक्षांना पासिंगसाठी दिलेल्या ठिकाणाहून ३३ किमी प्रवासाची मर्यादा प्रादेशिक परिवहन विभागाने घालून दिलेली असतांना त्यांचा नियम मोडून रिक्षाधारकांना ६० किमी अंतरावरील विरार येथे जाण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. वेळेत पासिंग न केल्यास प्रति दिवस ५०रुपयांचा दंड ही आकारणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे फुकटचा भुर्दंड गरीब रिक्षाधारकाना सहन करावा लागणार आहे. त्यातच नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या अहमदाबाद-मुंबई महामार्ग वरून विरार गाठणे खर्चिक, मानसिक त्रासदायक व धोकादायक ठरणार असल्याचे रिक्षा युनियनचे म्हणणे आहे.आता तर विरार येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पासिंगची चाचणी प्रक्रिया कल्याण येथे हलविण्यात येणार आहे असे, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक-मालक सेनेचे अध्यक्ष मनोज घरत यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. त्यामुळे पालघर-डहाणू येथून १२५ किमी लांब कल्याण येथे गाड्या पासिंगला घेऊन जाणे सर्वच दृष्टीने खूपच त्रासदायक ठरणारे आहे. त्यामुळे बुधवारी पालघर मुख्यालयाच्या भूमीपूजनाला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आॅटो टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष केतन पाटील, उपाध्यक्ष सुनील जगताप आणि छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मनोज घरत, विजय किणी आदिंनी भेट घेऊन पालघर मध्येच प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरू करावे अशी मागणी केली. शुक्रवार पासून सुरू होणार्या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनात पालघर, बोईसर, सफाळे, सातपाटी, डहाणू आदी भागातील हजारो रिक्षा बंद राहणार असल्याने रिक्षावर अवलंबून असणारे कामगार, विद्यार्थी, छोटे-मोठे विक्रेते, मत्स्यव्यवसायिक आदी वर मोठा विपरीत परिणाम होणार आहे. प्रवाशांचा मोठा भर एसटी ला उचलावा लागणार आहे.