शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा सापडली आचारसंहितेच्या पेचात; भाजपाकडून तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:00 IST

मतदान केंद्रापासून २०० मीटरचा भाग हा प्रतिबंधित, रिक्षावाल्यांना फटका

- हितेन नाईक पालघर: बहुजन विकास आघाडीला रिक्षा चिन्ह मिळाल्याने मतदानाच्या दिवशी सर्व रिक्षाची वाहतूक बंद ठेवण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी एकी कडे केल्याने रिक्षा चालकामधून तीव्र संताप व्यक्त केला जात असताना दुसरी कडे दिव्यांग, जेष्ठ नागरिक आणि रु ग्णांना मतदान केंद्रा पर्यंत नेण्यात येणाºया रिक्षावर निवडणूक निर्णय अधिकाºया कडून ही मज्जाव करण्यात येणार असल्याने जेष्ठांना मतदान केंद्रा पर्यंत पोचायला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.बहुजन विकास आघाडीकडून शिट्टी हे चिन्ह भाजप-सेनेच्या प्रयत्नाने हिसकावून घेतल्या नंतर बविआ उमेदवार बळीराम जाधव यांना रिक्षा चिन्ह मिळाल्याने मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार शुक्ला यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या कडे केली आहे. बहुजन विकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक बिथरले असून उद्या आम्हाला रेल्वे इंजिन चिन्ह मिळाले असते तर सर्व रेल्वे सेवा बंद ठेवली असती का? असा प्रश्न आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित करून कमळ, घड्याळ, हाताचा पंजा, या चिन्हा बाबत काय? असा उपप्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.आरटीओकडून जिल्ह्यात सुमारे ३३ हजार रिक्षाचीं नोंद करण्यात आली असून गरीब रिक्षाधारकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह रिक्षावर चालत असतो. आज हजारो रिक्षाचा वापर प्रचारासाठी केला जात असून या व्यवसायातून चांगले उत्पन्न रिक्षा धारकांना मिळत आहे. तर अनेक दिव्यांग, जेष्ठ नागरिक, रु ग्णांना मतदान केंद्रापर्यंत पोचिवण्यासाठी रिक्षाची व्यवस्था करण्यात येते. मतदान केंद्रा पासून २०० मीटर चा भाग हा प्रतिबंधित भाग म्हणून रेखांकित केला जातो. या प्रतिबंधित भागा मध्ये प्रचार करण्यास, उमेदवारी चिन्ह नेण्यास, मतदारांना प्रभावीत करण्यास निवडणूक निर्णय विभागाने बंदी घातली आहे.वसई, विरार तसेच अन्य भागात मोठ्या प्रमाणात रिक्षा ची वाहतूक सुरू असत. त्यात बविआ चे कार्यकर्ते या दरम्यान मतदारांना आॅटो रिक्षा दाखवून त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील अशी तक्रार शुक्ला यांनी केली आहे. दरम्यान, आ. ठाकूर यांनीही सर्वसामान्यांची ओळख असा रिक्षाचा प्रचार केला आहे. त्यामुळे २९ एप्रिल रोजी होणाºया मतदानाच्या दिवशी सर्व रिक्षा प्रतिबंधित भागाच्या बाहेर ठेवाव्यात अथवा त्यादिवशी सर्व रिक्षा बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नारनवरे यांची भेट घेत विचारले असता प्रतिबंधित भागापर्यंत वाहने नेण्यास यापूर्वीही बंदी होती आणि ती आताही राहणार आहे.भाजपच्या पदाधिकाºया कडून आमच्या व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यातील सर्व रिक्षाधारक रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू अश्या प्रतिक्रि या रिक्षाधारका कडून व्यक्त केल्या जात आहेत.तीन हजार २०० जणांची नोंद सर्वच पक्षांसमोर ठरणार आव्हाननिवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ज्या मतदारांना मतदान केंद्रा पर्यंत पोचण्यास त्रास होत असेल अशा ३ हजार २०० मतदारांची नोंद मतदान यादी वरून करण्यात आली असून व्हीलचेअर वरून त्यांना मतदान केंद्रा पर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.सातपाटी सह किनारपट्टीवरील अनेक गावातील मतदान केंद्रा समोर मोठया वाळूचे ढीग असल्याने व्हील चेअर चा उपयोग होणार नसल्याने आणि रिक्षांना परवानगी नसल्याने मतदानासाठी आलेल्या अनेक जेष्ठ नागरिक, दिव्यांग,आजारी रु ग्णांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर