शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईनंतर रहिवासी वाऱ्यावर; धाेकादायक इमारतींतील बेघर हलाखीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:59 IST

घरभाडे भरायचे की पाेटाला खायचे?

नालासोपारा : धाेकादायक इमारती काेसळून जीवितहानी हाेऊ नये, यासाठी न्यायालयाने अशा इमारतींवर कारवाइचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, वसई-विरार महापालिकेने अनेक धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्यानंतर शेकडाे रहिवाशांनी अशा इमारतींतील घरे रिकामी केली. ज्यांनी नकार दिला, त्या इमारतींचे नळजाेडणी ताेडून त्यांना घर रिकामे करण्यास लावले. त्यानंतर, या इमारतींवर हाताेडा चालवून त्या जमीनदाेस्त केल्या. पालिकेने आपले कर्तव्य पूर्ण केले असले, तरी या इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांना मात्र वाऱ्यावर साेडण्यात आले. त्यामुळे आमचा वाली काेण, असा प्रश्न हे रहिवासी विचारत आहेत.बेघर झालेले अनेक जण भाड्याने खाेली घेऊन राहत आहेत. काेराेनाच्या काळात त्यातील अनेकांच्या नाेकरीवर गदा आली आहे. त्यांचे व्यवसाय बुडाले आहेत. त्यामुळे त्यांना राेजच्या जेवणाचा प्रश्न सतावत असताना घराचे भाडे कुठून भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० ते ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती ग्रामपंचायत काळातील आहेत. तेव्हा जमिनींच्या किमती खूप कमी होत्या, पण आता या जमिनींना साेन्याचा भाव आला आहे. आदिवासींच्या जमिनींवर किंवा पगडी पद्धतीने खरेदी केलेल्या इमारतींचा डीसी नियमांनुसार अधिकृत पुनर्विकास करणे शक्य नसल्याने माेठा पेच निर्माण झाला आहे.भाजपचे वसई-विरार उपाध्यक्ष मनोज बारोट म्हणाले की, ३४ वर्षांपूर्वी बांधलेली इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने दाेन वर्षांपूर्वी महापालिकेने नोटीस बजावून इमारत रिकामी करून ती पाडली. त्यानंतर, रहिवाशांनी बांधकाम ठेकेदारामार्फत मारत बांधली. हे बांधकाम पालिका कार्यालयापासून केवळ ५०० मीटर अंतरावर सुरू होते, तेव्हा प्रशासनाने काहीच हस्तक्षेप केला नाही. बांधकाम पूर्ण हाेताच रहिवासी राहण्यास आले, तेव्हा मनपाने इमारतीला तोडक कारवाईची नोटीस बजावून माेकळे झाले. ‘बांधकाम सुरू असतानाच कारवाई आवश्यक’ बेकायदा बांधकामांवर कारवाई झालीच पाहिजे, पण बांधकाम सुरू असतानाच ती का केली जात नाही, त्यामुळे खरेदी करणाऱ्या नागरिकांची आर्थिक फसवणूक हाेऊन त्यांचे संसार रस्त्यावर येतात. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार तोडक कारवाई केल्यानंतर बेघर झालेल्या हजारो कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी काेणी घ्यायची, असा सवाल बाराेट यांनी केला आहे.