शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

घरे भाड्याने देण्यापूर्वी पोलिसांना कळविणे बंधनकारक, अन्यथा होणार गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:49 IST

पालघर जिल्ह्यातील विशेषत: वसई तालुक्यात आणि नालासोपारा शहरात नायजेरियन, बांगलादेशी आणि इतर परकीय नागरिकांचे वास्तव्य वाढते आहे.

मंगेश कराळे नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील विशेषत: वसई तालुक्यात आणि नालासोपारा शहरात नायजेरियन, बांगलादेशी आणि इतर परकीय नागरिकांचे वास्तव्य वाढते आहे. नायजेरियन नागरिकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अंमली पदार्थांची तस्करी यामुळे नालासोपारा शहरातील पोलीस ठाण्यामध्ये गेल्या चार महिन्यात ४ ते ५ नायजेरियनना अटक करून कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या सर्वांवर लगाम घालण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी आणि पालघर पोलिसांनी कंबर कसली आहे.नायजेरियन आणि बांगलादेशी नागरिकांचे गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहून या नागरिकांना घरे भाड्याने देण्यापूर्वी त्यांची माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास स्थानिक नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.वसई तालुक्यातील नालासोपारा शहरामध्ये मोठ्या संख्येने नायजेरियन आणि इतर परकीय नागरिक वास्तव्यास येत आहेत. वसई, मीरा रोडमध्ये स्वस्त दरात सदनिका उपलब्ध होत असल्याने येथे त्यांचा या भागात लोंढा वाढतो आहे. याव्यतिरिक्त छुप्या पद्धतीने देखील परदेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले आहे. त्यातील अनेक नागरिक हे मादक पदार्थांच्या तस्करीत आणि लॉटरी फसवणुकीच्या गुन्ह्यात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सहन करावा लागतो आहे.या गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी पालघर पोलिसांनी एक मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून भाडेतत्त्वावर घरे देण्यासाठी नियमावली बनविण्याची विनंती केली होती. त्यानुसार या नायजेरियन नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पालघर पोलिसांनी ठोस पाऊले उचलली आहेत.संपूर्ण जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. परदेशी नागरिकाची शहानिशा करूनच त्यांना घर, दुकाने हॉटेल तसेच जमीन भाड्याने देण्यापूर्वी त्यांची रीतसर भाडे करार करून नजीकच्या पोलीस घर मालकाला ठाण्यात माहिती दिल्याशिवाय भाड्याने देऊ नये, असे आदेश पालघर पोलिसांनी दिले आहेत.>पोलिसांना कोणकोणतीमाहिती देणे बंधनकारक...घर भाड्याने देणाºया व्यक्तीने स्वत:हून पोलिसांना त्यांनी परकीय नागरिकांना घर भाड्याने दिल्याबाबत कळविणे.सदर व्यक्तीचा नुकताच काढलेला फोटो.मूळ गाव व देशाचा पत्ता पुराव्यासह देणे.सदर व्यक्ती ज्या घरात येणार आहे व ती कोणत्या दलालामार्फत येते त्या दलालाची संपूर्ण माहिती.सदर व्यक्ती सोबत त्यांचे कुटुंबीय/ मित्र यांचा ग्रुप फोटो देणे.सदर व्यक्ती कोणत्या कारणामुळे इकडील भागात स्थलांतर करत आहे याचे कारण.नमूद परकीय नागरिकांचा वैध पासपोर्ट व व्हीजाची प्रत देणे.>परदेशी नागरिकांच्या उपद्रवामुळे वसई तालुक्यातील स्थानिक नागरिकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विशेषत: नायजेरिनय, बांगलादेशी नागरिकांची माहिती पोलिसांना मिळणार असून त्यांच्यावर वचक बसविण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसात ही मोहीम अधिक तीव्र स्वरूपाची होणार असून गांभिर्याने लक्ष या मोहिमेमध्ये देण्याचे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.- विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई