शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

भेट कलमाद्वारे झाडांना नवसंजीवनी, उत्पादन वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:27 IST

‘भेट कलम’ हा कलमांचा एक प्रकार असून त्याद्वारे झाडांचे आयुष्य वाढविण्यासह फळांचा दर्जा तसेच उत्पादन वाढविता येते. शिवाय यामुळे अ‍ॅग्रो टुरिझमचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.

- अनिरुद्ध पाटील डहाणू/बोर्डी : ‘भेट कलम’ हा कलमांचा एक प्रकार असून त्याद्वारे झाडांचे आयुष्य वाढविण्यासह फळांचा दर्जा तसेच उत्पादन वाढविता येते. शिवाय यामुळे अ‍ॅग्रो टुरिझमचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.तालुक्यातील कोसबाड नजीकच्या झारली या आदिवासी पाड्यावर नारायण पटलारी यांनी आपल्या शेतातील आंबा कलमांवर या पद्धतीचे प्रयोग केले आहेत. त्यामुळे झाडांचे विविध आकार पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. केवळ सुशोभीकरणच नव्हे तर कलमांना दीर्घायुषी करण्यासह त्याचे अनेक फायदे असल्याचे पटलारी सांगतात. आंबा कलमाची लागवड केल्यानंतर त्याचे सोटमुळ कमकुवत होते. यासाठी कलमाच्या भोवती चार ते पाच कोय लावून साधारण वर्षभराचे रोप झाले की जोड कलम करून त्या मुख्य कलमाला चारही रोपांचा एकत्रित आधार द्यायचा. यामुळे अन्नद्रव्य मिळून कलमाची वाढ जोमाने होते. महत्त्वाचे म्हणजे, मजबुती वाढून झाड उन्मळून पडण्याचा धोका टळतो. उत्पादन क्षमता वाढून फळांचा आकारही मोठा होण्यासह एकाच झाडापासून विविध जातींची कलमे करून फळे मिळतात. पाण्याची कमतरता असलेल्या भागात ही पद्धत लाभदायी आहे.>‘कलमाची साल आवश्यकतेनुसार कापून नवीन रोपाचा शेंडा जोडून त्यावर ग्रीस लावल्याने, त्या भागाला पाणी लागणार नाही. प्लास्टिक पट्टी बांधावी. साधारणत: दोन महिन्यात कलम जोडला जातो. पावसाळ्यात आर्द्रता असताना हा कलम करता येतो.’- प्रा.उत्तम सहाणे (शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र)>‘या पद्धतीने कलम बांधणारे अनेक आदिवासी कारागीर आहेत. या पद्धतीचा प्रचार-प्रसार झाल्यास त्यांच्या हाताला रोजगार मिळेलच. शिवाय आहेत त्या वृक्षांचे जतन करता येईल.’- नारायण पटलारी (कलम बांधणारा कारागीर)