शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई कायमची दूर करा

By admin | Updated: February 5, 2017 02:21 IST

सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करीत आहे़ तिच्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्पुरती

विक्रमगड : सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करीत आहे़ तिच्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी ती कायमस्वरुपी दूर केली जावी, त्यासाठी लागणारा निधी आमदार, खासदार यांनी आपल्या निधीतून द्यावा अशी मागणी देखील जनता करीत आहे. तालुक्यातील मागास गाव चिंचपाडा येथे तर गेल्या अनेक वर्षांपासून नळ योजना राबविलेली नाही़ त्यातच जलस्वराज्य प्रकल्पातील विहिरींच्या बांधकामातदेखील अपहार झाल्याने त्या अर्धवट आहेत. तर पूर्ण झालेल्या अनेक विहिरी कायमस्वरूपी जलस्त्रोतांचा शोध न घेताच खोदून ठेवल्याने त्यातील पाण्याने तळ गाठायला सुरुवात केली आहे़ या पार्श्वभूमीवर श्रमजीवीचे तालुका सचिव कैलास तुंबडा यांनी लोकमतला सांगितले की प्रशासनाकडून गावांना टँकरने पाणी पुरविले जाते. परंतु ही परिस्थिती अजून किती काळ राहणार. ती बदलण्यासाठी येथे नविन धरण उभारणे आवश्यक आहे. कायमस्वरूनी जलस्त्रोतांचा शोध घेऊन मोठया पाणी योजना राबविणे, ज्या ग्रामपंचायतीच्या नळयोजना काही कारणास्तव बंद आहेत त्यातील त्रुटी दुर करुन त्या चालू करणे. बंधारे, वनराई बंधारे,व असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन करणे आवश्यक आहे़ वर्षानुवर्षे नुसता टँकरने पाणीपुरवठा करुन टंचाईवर कितपत मात करणाऱ? अंधेरी, चिंचपाडा येथील रहिवासी खडड्यांतील माती मिश्रीत व नदीतील, बंधा-यातील तळाचे पाणी वापरून आपली तहान भागवतात़ त्यासाठी एकतर पाण्याचे हंडे डोक्यावर आणावे लागतात किंवा कावडी पाण्यासाठी, ४ ते ५ मैल बैलगाडीने, टॅकरने, रिक्षाने पाणी आणण्यासाठी पैसेही मोजावे लागतात हे दृश्य में महिन्यांत जास्त प्रमाणात दिसते़ जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत विहिरी मंजूर केल्या व राबविल्या देखील परंतु तेही असमाधानकारक असल्याने विक्रमगड तालुक्यातील पाणी टंचाईवर कायम उपाया योजना करण्याची गरज आहे़ त्यासाठी येथील आमदार, खासदार व मंत्री महोदयांनी आपल्या निधीतून योजनांची दुरुस्ती, वीजबीले भरणे, ही कामे केली तरी पाणीटंचाईची झळ कमी होईल.विक्रमगड नगरपंचायतीच्या नविन पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला पालकमंत्री विष्णू सवरा यांनी मंजुरी मिळवावी व त्याची अंमलबजावणी तातडीने करून दाखवावी अशी विक्रमगड वासियांकडून मागणी होत आहे. जलयुक्त शिवार सारखी योजना या तालुक्यात कशी आणि किती राबविली गेली? तिचा काय लाभ झाला, ही माहितीही जनता विचारते आहे.़ (वार्ताहर)विक्रमगड तालुक्यातील पाणी पुरवठा विभागातील सर्वच पदे रिक्त आहेत़ माझ्याकडे अ‍ॅडीशनल चार्ज असल्याने मला जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो आहे. ़तरीही मी अर्धवट, बंद, नादुरूस्त पाणी योजनांचा आढावा घेऊन त्याची कामे मार्गी लावण्याकरीता प्रयत्न करीत आहे़ तसेच संभाव्य पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून टंचाईग्रस्त गाव-पाडयाकरीता १० टँकरची मागणी केली आहे़ - एस बी कदम, पाणीपुरवठा अभियंता