शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

गावितांविरुद्धचा आक्षेप फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:18 IST

अपक्ष सचिन शिंगडा यांचा खटाटोप : शासकीय निवासस्थानाची माहिती दडविल्याचा आरोप

-हितेंन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आपल्या उमेदवारी अर्जात मागील काही काळातील शासकीय निवासस्थानांचा वापर व त्यांची थकबाकी भरली नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडले नसल्याची काँग्रेसचे माजी खासदार दामू शिंगडा यांचे सुपुत्र व अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाº्यांनी फेटाळून लावली आहे.

शिवसेनेचे युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवितांना २०१८ मध्ये जोडलेल्या प्रतिज्ञा पत्रात रॉकी हिल्स १२, मलबार हिल, मुंबई येथे गेल्या १० वर्षाच्या आत शासकीय निवासस्थान मिळाल्याची नोंद केलेली आहे. तसेच संदर्भीय क्र .२ प्रमाणे एप्रिल २०१९ मध्ये सादर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गावित यांना मे २०१८ मध्ये पोट निवडणुकीत निवडून आल्यानंतर नवी दिल्ली येथे १४८-१५० साउथ अ‍ॅव्हेन्यू नवी दिल्ली येथे शासकीय निवासस्थान मिळाल्याचे नमूद केलेले आहे. त्यामुळे संदर्भीय १ चा अभ्यास केला असता भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी सांगितल्या प्रमाणे निवडणूक दिनांकाच्या तीन महिन्याच्या आत दहा वर्षांपूर्वी उमेदवारांनी कोणतेही शासकीय निवासस्थान मिळाले, वापरले असेल तर त्या सर्व शासकीय निवासस्थानांची माहिती व त्यांची कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच हे प्रमाणपत्र सादर न केल्यास कलम ३६ प्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याला संबंधित उमेदवाराच्या नामनिर्देशनपत्रमधील ती महत्वपूर्ण दोष असल्याचे मानून त्याचे नामनिर्देशन पत्र फेटाळणे हे बंधनकारक आहे. परंतु तसे झालेले नाही असा आक्षेप घेतला होता.सचिन शिंगडा यांचाच अर्ज गेला फेटाळलागावित यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रात त्यांना रॉकी हिल्स १२, मलबार हिल मुंबई, तसेच नागपूर विधान मंडळ आवारातील सदनिका आमदार असताना मिळालेले निवासस्थान तसेच कामगार कल्याण शासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून मिळालेल्या निवासांची माहिती लपवून ठेवून कोणत्याही प्रकारची विहित मुदतीतील कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जोडलेले नसल्याचे शिंगडा ह्यांचे म्हणणे होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनीही ही हरकत फेटाळून लावली.या लोकसभा मतदार संघात एकूण ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सचिन शिंगडा यांनी काँग्रेसचा ए.बी.फॉर्म न जोडल्याने त्यांचा अर्ज फेटाळला.पालघर लोकसभा पोटनिवडणूक २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप कडून निवडणूक लढविणाऱ्या राजेंद्र गावित, आणि निवडणूक आयोगांच्या थकबाकी संदर्भात माहिती न दिल्या प्रकरणी आधीच उच्च न्यायालयात दाखल याचिका प्रलंबित आहे,आताच्या आम्ही नोंदविलेल्या हरकती फेटाळल्याने आम्ही ह्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.

- सचिन शिंगडा, तक्र ारदार , अपक्ष उमेदवार

टॅग्स :palghar-pcपालघर