शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणाऱ्यांकडून केला वसईत १३ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:07 IST

प्रत्येक प्रभागात ९ स्वच्छता दूत : एकूण ९० जणांची नियुक्ती

वसई : या शहरात कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाºया नागिरकांविरोधात महापालिकेने स्वच्छतादूतांच्या माध्यमातून पुन्हा दंडात्मक कारवाई करण्यास सुरु वात केली आहे. मध्यंतरी ही कारवाई बंद करण्यात आली होती. वसई-विरारमध्ये महिन्याभरात तेरा लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.शहरात कचरा टाकणाºया तसेच इतर अनेक मार्गाने शहर अस्वच्छ करणाºयांना वचक बसविण्यासाठी या शहरात महानगरपालिकेने स्वच्छतादूतांची (क्लिनअप मार्शल) नेमणूक केली आहे. यासाठी महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर करून २०१८ ते २०२१ या तीन वर्षांसाठी चार कंपन्यांना ठेका दिला आहे. १० नोव्हेंबर २०१८ रोजी स्वच्छतादूतांचे काम सुरू झाले. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, धार्मिक स्थळे अशा विविध ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यांनी महिन्याभरात १३ लाखाचा दंड वसूल केला आहे. यामध्ये रस्त्यावर थुंकणे, कचरा करणे, वाहनातून कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे अशा गुन्ह्यÞांचा समावेश आहे. सध्या महानगरपालिकेतील ९ प्रभागात ही मोहिम सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रभागात १० असे ९ प्रभागात मिळून ९० स्वच्छतादूतांची नेमणूक केलेली आहे. या चार कंपन्यांना वसूल केलेल्या दंडातील ३० टक्के रक्कम कमीशन म्हणून देण्यात येणार आहे. यातील ७० टक्के महापालिकेला मिळणार आहेत. या दंडाची छापील पावती संबंधीताला दिली जाणार आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये तारांकित मानांकनामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील स्वच्छता अबाधित ठेवण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी वारंवार होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मात्र कारवाईला सुरुवात करण्याआधी ठेकेदाराला याबाबत जनजागृती करून जागोजागी फलक लावण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. परंतु कोणत्याही प्रकारचे जनजागृती विषयक कार्यक्रम न राबवताच दंड वसूल केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच काही स्वच्छतादूतांकडून दमदाटी करून दंड वसूल केला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. जे स्वच्छतादूत दमदाटी करून दंड वसूल करत आहेत. त्यांच्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी ठेकेदार व नेमण्यात आलेले स्वच्छतादूतांची विशेष बैठकही घेण्यात येणार आहेत.महापालिकेतर्फे जनजागृतीसाठी जाहिरात फलक शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहेत. शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी होणारा कचरा आणि अस्वच्छता नियंत्रणात आणण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ९ प्रभागात ही मोहिम सुरू आहे.- वसंत मुकणे,वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार