विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात रेती, खडी, दगड, माती यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून ८ लाख २८ हजार रू. चा दंड महसूल खात्याने वसूल केला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यापासून महसूल विभागाचे अधिकारी या परिसरात अनधिकृत रेती, दगड, खडी यांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवून त्यांच्याकडून दंड वसूल करून तो शासनाच्या तिजोरीत भरणा केली. तर महसूलचा रितसर परवाना काढून शासनाची (फी) महसूल भरून एकूण वेगवेगळ्या लेखाशिर्षका अंतर्गत ४७ लाख, ८६ हजार रू. महसूल वसूल करण्यात आला आहे. तालुक्यासाठी २ कोटी रू. चा इष्टांक देण्यात आला आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे.या भागात रेती उपसा करण्यासाठी परवाने नाहीत त्यामुळे आदिवासींना रोजगारही मिळत नाही. तरी परवाने द्यावे, अशी मागणी आदिवासी बेरोजगारांनी केली आहे हे परवाने देण्यात आले तर अवैध रेती वाहतूक होणारच नाही. (वार्ताहर)
गौण खनिजाच्या अवैध वाहतूकदारांकडून दंड वसूल
By admin | Updated: January 2, 2016 23:55 IST