शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विरारच्या आयर्नमॅन हार्दिक पाटलांच्या नावे विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 10:33 IST

२०२४ मध्ये तब्बल १० पूर्ण आयर्नमॅन, १ अर्ध आयर्नमॅन, १ अल्ट्रामॅन तर २ वर्ल्ड मेजर मॅरेथॉनचा साहसी विक्रम नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारचा आयर्नमॅन अशी ओळख असलेल्या हार्दिक पाटील याने आता आपल्या नावावर आणखी काही नव्या विक्रमांची नोंद केलेली आहे. यापूर्वी अनेक अर्ध व पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा तसेच अल्ट्रामॅन, वर्ल्ड मेजर मॅरेथॉन स्पर्धा देश विदेशात जाऊन हार्दिक पाटील यांनी यशस्वीरित्या सफल केल्या आहेत. त्यांच्या विक्रमी नोंदींमध्ये आणखी काही महत्वपूर्ण व विक्रमी स्पर्धेंची व त्या स्पर्धा ठराविक वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करण्याची भर पडलेली आहे.

हार्दिक पाटील यांनी नुकताच फेब्रुवारी २०२४ मध्येच 'फ्लोरिडा २०२४अल्ट्रामॅन' हि स्पर्धा सलग तीन दिवसांत अमेरिकेतील 'फ्लोरिडा' याठिकाणी सातासमुद्रापार परदेशात पुर्ण करत देशाचे तसेच महाराष्ट्राचे नाव जग पातळीवर उंचावले होते आणि भारताचा झेंडा अटकेपार फडकवला होता; त्यानंतर आता एका वर्षभरातच १० फुल आयर्नमॅन स्पर्धा जर्मनी, फिलिपिन्स, ऑस्ट्रिया, ॲस्टोनिया, स्वीडन, जपान, स्पेन, अमेरिका, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये जाऊन तर भारतातील गोवा येथे १ अर्ध आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत.

त्याच बरोबरीने जपान आणि जर्मनी ह्या देशांमध्ये ह्याचवर्षी 'वर्ल्ड मेजर मॅरेथॉन' स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रमसुध्दा हार्दिक पाटलांनी केलेला आहे. शिवाय जगभरात झालेल्या फुल आयर्नमॅन स्पर्धा ३५ वेळा पूर्ण करणारा दुसरा भारतीय तर हाफ आयर्नमॅन स्पर्धा २१ वेळा पूर्ण करणारा प्रथम भारतीय ह्या साहसी विक्रमांची नोंद देखील हार्दिक पाटील यांनी आपल्या नावे जमा केली आहे. हार्दिक पाटील यांच्या कामगिरीचं सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे. यापूर्वीदेखील अनेक साहसी, विक्रमी नोंदी त्यांच्या नावे आहेत.

फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित ट्रायथलॉन रेस आहे. यात ४ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे यांचा समावेश असतो. या तिन्ही शर्यती क्रमाने आणि ब्रेकशिवाय पूर्ण करायच्या असतात. १७ तासांच्या कालावधीत ही आव्हानं सर करावी लागतात. ही स्पर्धा आर्थिक दृष्ट्या महाग असल्याने सर्वसामान्य खेळाडूला या स्पर्धेचं चॅलेंज स्वीकारणे आर्थिक अडचणींमुळे शक्य होत नाही, परंतु 'मी लवकरच भारतासह पालघर जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांना यात सामाहून घेत, स्पर्धेकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे', अशी माहितीही त्यांनी दिली. येणाऱ्या काळामध्ये पालघर, ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ म्हणून स्पोर्ट क्लब देखील उघडणार असल्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार