शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

बोअरच्या पाण्यावर टोमॅटोचे विक्रमी पीक

By admin | Updated: March 28, 2017 05:12 IST

सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी स्वत: कूपनलिका खोदून तिच्या

वसंत भोईर / वाडासिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकऱ्यांनी स्वत: कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर टॉमेटोचे विक्रमी पीक घेतले आहे. यंदा भावही चांगला असल्याने शेतकरी आनंदात आहेत. टॉमेटेची शेती लाभदायक ठरत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले देवघर हे एक खेडेगाव. या गावाच्या आजूबाजूला कोणतीही नदी अथवा मोठा तलाव, कालवा नाही. मात्र येथील शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर ते विविध प्रकारची पिके घेत आहेत. भातपिकानंतर येथील शेतकरी टॉमेटेची लाभदायक शेती करीत आहेत. टॉमेटोच्या अलंकार, अभिनव या वाणाचे बियाणे आणून ते स्वत:च रोप तयार करतात व त्याची लागवड करून रोपे उरली तर त्यांची विक्रीसुद्धा करतात. सर्वप्रथम भातपीक काढल्यानंतर शेताची नांगरणी करून वाफे तयार केले जातात. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये त्यात त्याची लागवड केली जाते. साधारणपणे ५० ते ६० दिवसांनी फळधारणा होते. त्यानंतर चार दिवसांनी फळे काढणीला येतात. योग्य वेळी फळ तोडणी झाली तर पुढचे फळ व्यवस्थित होते. एका एकरातून १५०० क्रेट टॉमेटे निघतात. त्याचे वजन ५० ते ५५ टन भरते. एका एकराला अंदाजे दीड लाख रु पये खर्च येतो. मात्र जसा बाजारभाव असेल त्या प्रमाणे नफा-तोटा होतो. या वर्षी प्रति क्रेटला ४०० रूपये भाव मिळत असल्याने एकराला चार लाखापर्यंत उत्पन्न मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. अलंकार या जातीच्या वाणाची लागवड येथील शेतकरी मोठयÞा प्रमाणात करतात. कारण हे फळ मोठे असते व उष्णतेत ते टिकते. साधारणपणे पंधरा दिवसांपर्यत या फळाला काहीही होत नाही. त्यामुळे या वाणाला बाजारात जास्त मागणी आहे. बुधाजी पाटील या शेतकऱ्याने आपल्या चार एकर अशा विस्तीर्ण जागेत टॉमेटे शेती केली आहे. संपूर्ण जागेत ठिबक सिंचन केले असून औषधेही ठिबक सिंचनातून दिली जातात.येथील जमीन टोमॅटोसाठी अत्यंत उपयुक्तया पिकाला फारशी मशागत करावी लागत नाही तसेच ठिबक सिंचनामुळे मजूर कमी लगातात. अशी माहिती बुधाजी पाटील यांनी दिली. येथील जमीन टॉमेटोसाठी पोषक असल्याने रोगाचे प्रमाणही कमी असते असेही त्यांनी सांगितले. दैनंदिन आहारात टॉमेटो हा महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात टॉमेटेला पसंती दिली जाते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टॉमेटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षापासून आपला लौकिक कायम राखला आहे. तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने हा माल दलालामार्फत विकला जातो. मुंबई, वाशी, वसई, ठाणे येथील व्यापारी हा माल घेण्यासाठी जागेवर जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने माल विकावा लागतो अशी माहिती युवा शेतकरी नेते प्रफुल्ल पाटील यांनी दिली. तरूणांनी शेतीकडे वळून आधुनिक शेती करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.