शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर पालिकेच्या बोधचिन्हाला मान्यता

By admin | Updated: August 9, 2016 02:07 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सध्या वापरात असलेल्या बोधचिन्हास अखेर केंद्र शासनाच्या व्यापार चिन्ह नोंदणी विभागाने नोंदणीकृत करत त्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सध्या वापरात असलेल्या बोधचिन्हास अखेर केंद्र शासनाच्या व्यापार चिन्ह नोंदणी विभागाने नोंदणीकृत करत त्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पालिकेच्या परवानगीशिवाय हे बोधचिन्ह वापरणे बेकायदेशीर ठरणार आहे. यामुळे पालिकेचे बोधचिन्ह स्वत:च्या कंपनीच्या नावे नोंदणीकृत करण्याचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नीचे प्रयत्न फसल्यात जमा आहे. तब्बल २५ वर्षांनी पालिकेचे बोधचिन्ह नोंदणीकृत होत आहे. १९९१ साली तत्कालीन मीरा-भार्इंदर नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीनंतर नियोजन समितीचे सभापती लिओ कोलासो यांनी पालिकेचे बोधचिन्ह तयार केले होते. कोलासो हे स्वत: जे.जे. कला महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यामुळे स्थानिकांचा पारंपरिक व्यवसाय व त्यांना बोधचिन्हात स्थान दिले होते. या बोधचिन्हास स्थायी तसेच नियोजन समितीने मान्यता दिली होती. तेव्हापासूनच पालिका हे बोधचिन्ह वापरत होती. २००२ मध्ये महापालिका अस्तिवात आल्यानंतरही आधीच्याच बोधचिन्हाचा वापर सुरू आहे. त्यानंतर पालिकेचे बोधचिन्ह सर्रास खाजगी वाहनांवर बेकायदेशीरपणे वापरले जाऊ लागले. त्यात नगरसेवकांपासून ठेकेदार, राजकीय नेत्यांचाही समावेश होता. विशेषत: टोलमधून सूट मिळवण्यासाठी, तर बहुतांशी लोकांनी बोधचिन्ह लावण्याचा फंडा वापरला. पालिकेकडे याविरोधात तक्रारी सुरूच आहेत. पालिकेनेदेखील पोलिसांना कारवाई करण्यासाठी पत्र दिले, पण कारवाईदरम्यान हे बोधचिन्ह नोंदणीकृत आहे का, या प्रश्नावर मात्र पालिकेची अडचण झाली. २०१३ साली महासभेने बोधचिन्ह नोंदणीकृत करून घेण्याचा ठराव केला. मात्र, योग्य पद्धतीने पाठपुरावाच केला गेला नाही. मार्च २०१४ मध्ये सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विद्यमान आमदार आणि तत्कालीन पालिका विरोधी पक्षनेते नरेंद्र मेहता यांची पत्नी सुमन यांनी पालिकेला नोटीस पाठवून बोधचिन्हाचा वापर थांबवावा, असे कळवले. १८ जानेवारी २०१४ रोजी सुमन मेहता यांनी सेव्हन इलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीजच्या नावे केवळ मीरा-भार्इंदर महापालिका हा शब्द वगळून एमबीएमसी शब्द व बोधचिन्ह केंद्र शासनाच्या व्यापार चिन्ह नोंदणी विभागाकडे नोंदणीकृत करण्यासाठी अर्ज केल्याचे उघड झाले. बोधचिन्हच गमावल्यास नाचक्की होईल, या धास्तीने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कृष्णा इंटरनॅशनल या एजन्सीला नियुक्त करून २०१४ मध्ये बोधचिन्ह नोंदणीकृत करण्यासाठी अर्ज केला. (प्रतिनिधी)