शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्ड रद्द होणार नाही; पण कार्डावर मिळणारे रेशन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:10 IST

अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम झाली सुरू

पारोळ : वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांहून अधिक असल्यास त्यांचे रेशन कार्ड रद्द होणार, अशा बातम्या काही दिवसांपासून व्हायरल हाेत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नाही. ‘केशरी’ रेशन कार्ड असणारे व यापैकी ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या वर आहे त्यांचे कार्ड ‘श्वेत’ होणार आहे. याचाच अर्थ कार्डामार्फत मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केले जाणार नसल्याने त्यांचे धान्य बंद होणार आहे, मात्र रेशन कार्ड रद्द होणार नाही, अशी माहिती रेशनिंग व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम दिनांक १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे.अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम सुरू असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. ज्यात शोध मोहिमेंतर्गत शिधापत्रिका तपासणीची कार्यपद्धती ठरविणे, शिधापत्रिका तपासणीचा आढावा घेणे, खासगी किंवा सरकारी कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीकडे जर लाभार्थी किंवा केशरी शिधापत्रिका असेल मात्र त्यांचे उत्पन्न १ लाख रुपयांच्या वर असेल तर त्यांची केशरी शिधापत्रिका रद्द करून त्या जागी श्वेत शिधापत्रिका देणे, विदेशी नागरिकांना शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची दक्षता घेणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या समितीवर सोपविण्यात आल्या आहेत.... तर शिधापत्रिका होऊ शकते रद्दकार्डधारकांना आवश्यक ते पुरावे सादर करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जाईल. मात्र, तरीही संबंधित व्यक्ती ते आणण्यास असमर्थ ठरली तर त्याची शिधापत्रिका रद्द करण्यात येईल. उदा निवासस्थानाच्या पुराव्याबाबत छाननी करताना काही संशयास्पद आढळल्यास, शिधापत्रिकांच्या पुराव्याबत संशय आल्यास त्याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येईल.हे पुरावे आवश्यकनिवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन देयक, वाहनचालक परवाना (कार्यालयीन/इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदी पुरावे आवश्यक आहेत. मात्र, हे पुरावे एक वर्षाहून जुने नसावेत.वसई तालुक्यात या मोहिमेला सुरुवात झाली असून १ लाख रुपयांच्या वर वार्षिक उत्पन्न असेल त्याचे रेशनिंग कार्ड रद्द होणार नसून ते ‘सफेद’ होणार आहे. वसईतील नागरिकांनी या योजनेला सहकार्य करावे.    - रोशन कापसे, पुरवठा अधिकारी वसई