शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बविआ तालुकाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 23:39 IST

दहा वर्षापूर्वी जव्हार तालुका सेक्स स्कॅण्डलच्या घटनेने अवघ्या महाराष्ट्रात गाजला होता

जव्हार : कुटुंब उद्ध्वस्त करण्याची तसेच ठार मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचा जव्हार तालुकाध्यक्ष दत्तू यशवंत घेगड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या फिर्यादीवरून जव्हार पोलिसांनी ही कारवाई करत दत्तू घेगड यास अटक केली आहे. या घटनेने जव्हारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दहा वर्षापूर्वी जव्हार तालुका सेक्स स्कॅण्डलच्या घटनेने अवघ्या महाराष्ट्रात गाजला होता. त्यानंतर पुन्हा एका बलात्काराच्या घटनेने जव्हार शहरात खळबळ उडाली आहे. जव्हार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तू यशवंत घेगड याने जव्हार येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात कामासाठी म्हणून असलेल्या एका ३६ वर्षीय महिलेस २०१७ पासून ठार मारण्याची आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवत वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला आहे. अखेर पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दत्तू घेगड याला जव्हार पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे जव्हार पोलीस ठाण्याला भेट दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे अधिक तपास करत आहेत. या घटनेबद्दल नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.