शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जव्हारमध्ये रमजान ईद अत्यंत उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:56 IST

हिंदू बांधवांनीही दिल्या गुलाबपुष्पासह शुभेच्छा

जव्हार : रमजानचे पूर्ण महिन्याचे कडक रोजे पाळून मुस्लिम बांधवांनी चंद्रदर्शन झाल्याने बुधवारी सकाळी ९ वाजता ईदगाह मैदानात ईद उल फित्रची नमाज अदा केली, यावेळी शहरातील व परिसरातील मुस्लिम बांधव बच्चे कंपनीसह नवीन पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित होते,

यावेळी सुन्नी जामा मशीदचे मौलाना नौशाद यांनी ईदचा दिवस ज्यांनी महीनाभर रोजे ठेवले त्यांनी पाच वेळा नमाज पठन केले, कुरआन पठन केले, ज्यानी अल्लहा ला राजी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या साठी हा दिवस खुप आनंदाचा असतोे, तसेच नमाज नंतर गळा भेट घेताना मनात वैर असेल तर ते काढून टाका एकमेकात जर काही वाद असतील तर ते मनापासून मिटवून टाका असा शुभेच्छा संदेश दिला, तसेच सुन्नी मुस्लिम ट्रस्ट चे अध्यक्ष सै. खलील कोतवाल यानी ईदच्या सर्वाना शुभेच्या दिल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा, दिलीप तेंडुलकर, नगरसेवक वैभव अभ्यंकर, गणेश राजपूत, माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य, बळवंत गावित, अशरफ लुलानिया, नगरसेवक भरत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक राकेश पगारे, सुरळकर आदिनी मुस्लिम बांधवाना ईदगाहच्या बाहेर पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.

दुपार नंतर मुस्लिम बांधव कुटुंबासहीत गावभर गळा भेट देण्यासाठी फिरतांना दिसत होते. मोठी गर्दी करून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जव्हार हनुमान पॉईंट व संनसेट पॉईंट येथे मुस्लिम बांधवांची गर्दी दिसत होती.

वाड्यात ईद उत्साहातवाडा : तालुक्यात आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील वाडा, खानिवली, कुडूस, वडवली व नारे या मुस्लिम लोकवस्ती असलेल्या गावात आज आनंदाचे वातावरण होते. आज सकाळीच सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

हिंदू बांधवानाही मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शुभेच्छा देत सणाचा आनंद घेतला. सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, अशोक पाटील, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास जाधव, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, नितीन जाधव, अनंता दुबेले यांनी मुस्लिम समाजाचे नेते मुस्तफा मेमन, इरफान सुसे यांना घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सहा वर्षांच्या मुलाने केले पूर्ण रोजेमनोर : रमजान ईद येथे उत्साहाने साजरी करण्यात आली नमाजानंतर टेन मनोर परिसरातील मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंदू बांधवांनी ही शुुभेच्छा देऊन शीरखुर्म्याचा आस्वाद घेतला. यावेळी सहा वर्षाच्या चिमुकल्याने पूर्ण रोजे ठेवल्याने त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू होता. रमजान महिना मुस्लिम धर्मा मध्ये सर्वात पवित्र मानला जातो चंद्र दर्शन झाले की रोजे ठेवायला सुरवात होते १० वर्षा पासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्व जण रोजा ठेऊ शकतात ते करण्याचा फर्ज त्यांना लागू आहे. परंतु मनोर मधील यायहा फरहान लोनबाल या सहा वर्षीय मुलाने रमजान चे पूर्ण रोजे ठेवल्याने त्याचे मनोर, पालघर भिवंडी ठाणे परिसरात कौतुक केले जात आहे कारण एवढ्या उन्हात त्याने पूर्ण महिना रोजे करून मुस्लिम समाज्या मध्ये एक संदेश दिला, असे त्याचे आजोबा रियाज मुल्ला यांनी लोकमतला सांगितले टेन-मनोर परिसरात ईद असो की दिवाळी दोन्ही समाज्यात एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्याची परंपरा दीर्घकाळापासून चालत आली आहे आणि ती आजही पाळली केली

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईद