शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

पावसाच्या धुवाधार बॅटिंगने वसई-विरारमध्ये साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:07 IST

महामार्गावरील वाहतूक मंदावली : ग्रामीण भागात शेतकरी सुखावले

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : पाऊस जूनपासून लपंडाव खेळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होण्याची चिंता सतावत असतानाच सोमवारी रात्रीपासून कोसळणाºया पावसाने मंगळवारीही वसई तालुक्यात धुवांधार बॅटिंग केली. त्यामुळे वसई, विरार आणि नालासोपारा या शहरी भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते. तसेच विरार-पश्चिमेतील वटार गावात पाणी शिरल्याने हे गाव पाण्याखाली गेले होते. तसेच मुंबई-अहमदारबाद मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. पावसाच्या या दमदार पुनरागमनाने शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.वसई-विरार शहर परिसरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन करत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे वसईला पूरस्थितीचा सामना करावा लागलेला नाही. गतवर्षीसारखी परिस्थिती ओढवली असती तर कोरोनाच्या संकटात बिकट परिस्थिती निर्माण झाली असती. गेल्या वर्षी मिठागरातील वस्त्या, नागरी वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका पोहोचल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाºयांमार्फत त्यांना सुरिक्षत स्थळी हलवण्यात आले होते.मुसळधार पावसात शहरांतील रस्ते, तसेच सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. नालासोपारा पूर्वेकडील सीतारा बेकरी, तुळिंज पोलीस ठाण्यासमोरील परिसर व गालानगर भागात दीड फुटांपर्यंत पाणी साचले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी ७ ते मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ७० मिलिमीटर पावसाची तालुक्यात नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ११२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.धरणसाठा वाढलाच्पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर शेतकरी सुखावले आहेत. तसेच धरणसाठ्यातही भर पडली आहे.च्कडक उन्हामुळे पिके करपण्याची शक्यता होती. मात्र, पावसाने पुनरागमन केल्यामुळे पिकांवरील धोका काही प्रमाणात टळल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.नालासोपाºयात रस्ते पाण्याखाली\१नालासोपारा : सोमवारी रात्रभर नालासोपारा पाऊ स कोसळल्यामुळे नालासोपारा शहराच्या सखल भागात गुडघ्याच्या वर पाणी साचले होते. सकाळी कामावर जाणाºया नोकरदारांना या पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला होता.२नालासोपारा शहराच्या पूर्वेकडील तुळिंज, सेंट्रल पार्क, विजयनगर, ओस्तवालनगर, अलकापुरी, गालानगर, टाकी रोड, प्रगतीनगर, महेश पार्कया ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. तर संतोष भवन, बिलालपाडा, धनिवबाग, श्रीरामनगर या परिसरातही गुडघ्याच्या वर पाणी साचले होते.