शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये शिवसेना-भाजपामध्ये राडा

By admin | Updated: July 15, 2017 11:57 IST

भार्इंदर पूर्वेच्या महापालिका क्रीडा संकुलाचे उद्घाटन पूर्वीच झाले असताना निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उद्घाटन करण्यावरुन भाजपा व शिवसेनेत राडा झाला.

ऑनलाइन लोकमत मीरारोड, दि. 15 - भार्इंदर पूर्वेच्या महापालिका क्रीडा संकुलाचे उद्घाटन पूर्वीच झाले असताना निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उद्घाटन करण्यावरुन भाजपा व शिवसेनेत राडा झाला. भाजपा आमदारासह काही कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. तर एकाला शिवसैनिकाने चोपल्याने वातावरण तंग बनले. मीरा भार्इंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या हस्ते रितसर झालेले होते. परंतु संकुलाचे बाकी असलेले काही काम व ते चालविण्यासाठी कुणी ठेकेदार येत नसल्याने ते सुरु केले जात नव्हते. मध्यंतरी जिद्दी मराठा संघटनेचे प्रदीप जंगम यांनी पालिके बाहेर धरणे आंदोलन केल्यावर अखेर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी कॅरम, बुद्धीबळ व बॅडमिंटनचे खेळ सुरू करायला लावले. दरम्यान सदर क्रीडा संकुल चालवण्याचे कंत्राट भाजपाचे पदाधिकारी व आमदार नरेंद्र मेहतांचे निकटवर्तिय करणी चरण यांच्या चॅम्पियन फाऊंडेशनने मिळवले. या बाबतचा करारनामा शेवटच्या टप्प्यात असून त्या नंतर सदर संकुल पूर्णपणे सुरू केले जाणार आहे. तोच पालिका निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेने भाजपाने आज शुक्रवारी सदर संकुलाचे उद्घाटन करण्याचा परस्पर घाट घातल्याची कुणकुण शिवसैनिकांना लागली. स्थानिक नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका तारा घरत, नगरसेवक जयंतीलाल पाटील सह शैलेष पांडे, स्रेहा पांडे, सचीन घरत आदी शिवसैनिकांनी आधीच जाऊन क्रिडा संकुलाचे फित कापून व नारळ फोडुन उद्घाटन केल्याचे जाहिर केले. सेनेचे झेंडे लावले. तोच भाजपा आ. मेहता, महापौर गीता जैन, नगरसेवक शरद पाटील, दिनेश जैन, डॉ. राजेंद्र जैन, डॉ. सुशील अग्रवाल, सुरेश खंडेलवाल, नगरसेविका दिपीका अरोरा, डिंपल मेहता सह फिरोज शेख, संजय थरथरे व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते संकुलाच्या आवारात भाजपाचे झेंडे घेऊनआले. संकुलाचे उद्घाटन करण्यावरुन दोन्ही बाजुने घोषणाबाजी सुरु झाली. संकुलात प्रवेश करण्या वरुन धक्काबुक्की व मारहाण झाली. आ. मेहता सह थरथरेंना धक्काबुक्की झाली तर एका भाजपा कार्यकर्त्यास चोप बसला. थरथरेंना देखील मारहाण झाल्याची चर्चा होती. पण स्वत: थरथरे यांनी मारहाण नव्हे धक्काबुक्की झाल्याचे सांगीतले. आ. मेहतांशी संपर्क होऊ शकला नाही. तर आम्ही स्थानिक नगरसेवक असुन येथील आमदार पण सेनेचे प्रताप सरनाईक आहेत. संकुलाला विरोध करणारया भाजपानेच परस्पर उद्घाटनाचा घाट घातल्याने शिवसेनेने त्यास प्रत्युत्तर दिल्याचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर म्हणाले. भाजपा व शिवसेनेतील या राडेबाजीची माहिती नवघर पोलिसांना कळताच पोलिस फाटा घटनास्थळी धाऊन आला. पोलिस आल्यावर सर्वांची पांगापांग झाली. - पालिकेचा कुठलाही उद्घाटनाचा कार्यक्रम नव्हता. या राडेबाजी बद्दल आपणास कल्पना नसुन बेकायदेशीर कृत्य करणारयांवर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करु. - डॉ. नरेश गीते, आयुक्त, मनपा  - जमावबंदीचा आदेश लागु आहे. या बाबत काय कारवाई करता येईल हे तपासुन पाहु -राम भालसिंग ,वरिष्ठ निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे