शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात लस घेण्यासाठी रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 23:57 IST

गर्दीला आवरण्यासाठी पाेलिसांना पाचारण : पालघर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यादरम्यान अचानक लाभार्थ्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे पालघर ग्रामीण रुग्णालयातील जेजे युनिट लसीकरण केंद्रात बाचाबाचीचे प्रसंग ओढवले. आरोग्य यंत्रणेने यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याने शेवटी पोलिसांना पाचारण केले. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार २३० लोकांनी पहिला डोस घेतला आहे, तर दुसरा डोस सहा हजार ३६५ लोकांनी घेतला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये पहिला डोस दोन रुग्णालये मिळून १४७ जणांनी घेतली आहे.१ मार्चपासून संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये कोविड १९ लसीकरण मोहिमेत ६० वर्षांवरील ज्यष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षांदरम्यानच्या दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी आपली नोंद कोविन ॲप, आरोग्य सेतू ॲप किंवा cowin.gov.in वर लॉग इन करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले होते. सुरुवातीला नोंदणीसाठी ॲपमध्ये असलेल्या अडचणीमुळे अनेकांना आपली नोंदणी करता आली नव्हती. मात्र अशा काही अडचणींवर आरोग्य विभागाने मात करून लसीकरण केंद्रामध्ये वाढ केल्याने लसीकरण लाभार्थ्यांमध्ये हळूहळू वाढ होऊ लागली.पूर्वी सुरुवातीला अॅपद्वारे नोंदणीकृत लाभार्थ्यांनाच लस देण्याच्या स्पष्ट सूचना असताना नेटच्या गोंधळामुळे लसीकरण केंद्रावर नोंदणी (ऑफलाइन) केलेल्या लाभार्थ्यांनाही लस देण्याच्या सूचना शासन पातळीवरून देण्यात आल्या. त्यामुळे दिवसभरात सुमारे २०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या शासन पातळीवरून सूचना असताना आरोग्य विभागाने २०० च्या वर लाभार्थ्यांचे लसीकरण केले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी जातीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असताना पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या जेजे हेल्थ युनिटमध्ये गुरुवारी सकाळी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान लाभार्थ्यांच्या गर्दीत हळूहळू वाढ होऊन मोठी गर्दी जमू लागली. मोलमजुरी करणारे, सेवानिवृत्त आदी सर्वच घटकांतील लाभार्थ्यांची एकच गर्दी जमू लागल्याने बाचाबाचीचे प्रसंग उद्भवले. यावर नियंत्रण मिळवणे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कठीण होऊन बसले. परिणामी, पालघर पोलिसांना पाचारण केल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले.

सर्व लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. दिवसाला २०० ची मर्यादा पार करून आम्ही त्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस देण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. - डॉ. दिनकर गावित, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय. पालघर.