शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:52 IST

परळी प्राथमिक आरोग्य केंद्र : निर्णयानंतर सहा महिने उलटले तरी हालचाल नाही

वाडा : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील परळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून या निर्णयाबाबत पुढे आजवर कुठल्याच हालचाली झाल्या नसल्याने सध्या येथे होऊ घातलेले परळी ग्रामीण रुग्णालय कागदावरच अडकले आहे.

परळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारी बहुतांशी गावे ही अतिदुर्गम भागातील आणि शंभर टक्के आदिवासीबहुल आहेत. पिण्याच्या पाण्यापासून ते पोटभर अन्नासाठी येथील आदिवासींना झगडावे लागते. या भागामध्ये साथीचे रोग, सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे येथील रुग्णांना पुढील उपचारासाठी वाडा अथवा ठाणे-मुंबईला जावे लागू नये म्हणून तत्कालीन आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन तसा शासन निर्णयही ५ आॅगस्ट २०१९ रोजी पारित केला. मात्र, गेल्या सहा महिन्यात या निर्णयाकडे आरोग्य विभागाने लक्ष दिलेले नाही.

परळी प्राथमिक आरोग्य अंतर्गत ५५ ते ६० गावे आणि अनेक पाडे येतात. सर्व गावपाड्यांची लोकसंख्या ही ६५ हजार ६०३ इतकी आहे. या आदिवासी भागासाठी ग्रामीण रुग्णालयाची नितांत गरज होती. त्यामुळे येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.विधिमंडळाच्या अनुसूचित जनजाती समितीचे तत्कालीन अध्यक्ष आ. रुपेश म्हात्रे यांनी परळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालय करण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. त्यावर तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे अनेक बैठका झाल्या होत्या. दरम्यान, डॉ. सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आरोग्य मंत्र्यांचा पदभार घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय होण्याच्या निर्णयाला मान्यता देत तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.हे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याच्या बाबतीत काही त्रुटी आहेत, त्याचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.- कांचन वानेरे, शल्य चिकित्सक, पालघर जिल्हा. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार