शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील शासकीय विकासकामांचा दर्जा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:40 IST

कमी दराने निविदा भरलेली कामे रखडली : ठेकेदारांवर कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागात शासनाकडून मोठ्या प्रमाणावर विकासकामे मंजूर केली जात आहेत. त्या कामांच्या ऑनलाइन पद्धतीने निविदा काढल्या जात आहेत, पण या ऑनलाइन पद्धतीत स्पर्धेच्या नावाखाली सदर निविदा या २५ ते २९ टक्के कमी दराने काही मोजक्या ठेकेदारांकडून भरल्या जात आहेत. त्यामुळे कमी दराने भरण्यात आलेली विकासकामेही जवळपास दोन ते तीन वर्षे केली जात नाहीत अथवा केली गेल्यास ती कामे दर्जाहीन केली असल्याचे दिसून येते. 

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल असल्याने महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर केली जात आहेत. महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग व पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग यांच्यामार्फत सदरची विकासकामे केली जात आहेत. शासनाच्या धोरणानुसार तीन लाख रकमेच्या वरची कामेही ऑनलाइन पद्धतीने निविदा काढून केली जातात. पण जिल्ह्यातील काही मोजके ठेकेदार ही कामे फारच कमी दराने निविदा भरून मोठ्या प्रमाणावर आपल्या पदरात पाडून घेत आहेत. पालघर जिल्ह्यात अशा प्रकारे कमी दराने निविदा भरून मोठ्या प्रमाणावर कामे घेणारे मोजके ठेकेदार हे सदरची विकासकामे दोन ते तीन वर्षे रखडवत आहेत. तसेच विकासकामांचा योग्य तो दर्जाही राखला जात नाही, असा आरोप केला जात आहे. 

सा.बां. विभाग डहाणूमध्ये एकही असे काम नाही. परंतु काही रस्ते जिल्हा परिषदेचे असल्याने त्याची एनओसी घेणे गरजेचे असल्याने त्या कामाला विलंब होतो.- धनंजय जाधव, उपविभागीय अधिकारी, सा.बां. विभाग, डहाणू

डहाणूच्या जंगलपट्टी भागात अनेक कामे अर्धवट स्थितीत 

nदरम्यान, डहाणूच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभाग, आदिवासी विकास विभाग डहाणू यांच्यामार्फत तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्ते डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण, पूल, साकव, मोऱ्या, अंगणवाडी, शौचालय इत्यादी विकासाचे काम झाले. 

nगेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीचे कारण पुढे करीत काही ठेकेदारांनी कामाची सुरुवातदेखील केली नाही. परंतु अशा ठेकेदारावर कोणतीच कारवाई झालेली नाही. तर डहाणूच्या जंगलपट्टी भागांत कमी दराने घेतलेली कामे अद्याप अर्धवट स्थितीत पडून आहेत. 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर