शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तोंडात सिमकार्ड टाकून विवाहितेचा दाबला गळा

By admin | Updated: March 11, 2017 15:39 IST

विरारमध्ये नवविवाहितेची जाळून हत्त्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच वसई वालीव परिसरात एका 24 वर्षीय विवाहितेची तिच्या सासरच्या मंडळीने क्रूरपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन लोकमत

वसई, दि. 11 - विरारमध्ये नवविवाहितेची जाळून हत्त्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच वसई वाळीव परिसरात एका 24 वर्षीय विवाहितेची तिच्या सासरच्या मंडळीने क्रूरपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयातून सासरच्या मंडळींनी विवाहितेची हत्या केली. मृत महिला सतत मोबाइलवर बोलत असते म्हणून मोबाइलचे सिमकार्ड तिच्या तोंडात टाकून तिची गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली.  वाळीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सासू, सासरे, दीर आणि नंदेला अटक केली आहे.  
नालासोपारा पूर्वेला पेल्हार गावात महापालिकेच्या कार्यालयासमोर सरिता वर्मा ही आपला पती अभिमन्यू वर्मा (२८ ),  सासू शीला वर्मा (४८), सासरे महेश वर्मा (५१ ) आणि दीर भगत वर्मा आणि नणंद रेखा वर्मा (२६) यांच्यासह राहत होती. सरिताचे पती अभिमन्यू यांचे याच ठिकाणी छोटे हॉटेल आहे.
 
सरिता आणि तिची सासू शीला वर्मा यांचे आपापसात पटत नव्हते. यांच्यात सतत छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होत असत, शीला आणि इतर सासरची मंडळी सरिताला सतत हुंड्यासाठी त्रास देत असत. सरिता सतत  फोन वर बोलत असल्याचे सांगत तिची सासू सरिताला मारहाण करत तिच्या चारित्र्यावरून ही तिचा छळ करत असत अशी माहिती सरिताच्या आईने दिली.
सरिताचा पती अभिमन्यू गावी गेल्यावर तिच्या सासरच्या मंडळीने सरिताचा काटा काढण्याचा कट रचला होता. आणि याच वेळी गावी काही काम निघाल्याने अभिमन्यू गावी गेला. सरिताच्या सासरच्या मंडळीने संधीचा फायदा घेत सरिताची निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिने गळफास लाऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पण पोस्टमोर्टेम रिपोर्टमध्ये सरिताची गळा दाबून आणि डोक्यावर जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे समोर येताच पोलिसांनी सासरच्या मंडळीना बेड्या ठोकल्या.