शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘पालिकेच्या जागेत स्वतंत्र मंडई द्या!’

By admin | Updated: August 10, 2016 02:17 IST

शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचल्यास त्यांना चांगला नफा मिळेल यासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या परिसरात शेतकऱ्यांना

राहुल वाडेकर, विक्रमगडशेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचल्यास त्यांना चांगला नफा मिळेल यासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या परिसरात शेतकऱ्यांना स्वतंत्र (मंडई) उपलब्ध करून द्यावी असे साकडे युवास्पर्श या सामाजिक संघटनेने वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर प्रविणाताई ठाकूर यांना घातले असता त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी कामगार नेते महेंद्र ठाकरे, माजी महापौर नारायण मानकर, नगरसेविका संगीता भरे, स्वाभिमानी कुणबी सेनेचे पालघर जिल्हा सचिव मिलिंद पाटील हे उपस्थित होते.एकीकडे शेतकरी दिवसेंदिवस अहोरात्र शेतीत राबत असतो तर दुसरीकडे भात शेतीत म्हणावं तितकं उत्पादन व भाताला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी अत्यंत अस्वस्थ झाला आहे.तरीही त्याने अजूनही शेतीची जिद्द सोडली नसून तो भविष्यात काहीतरी चांगला नफा मिळेल अशा आशेवर जगून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकीत आहे. भातशेतीला पूरक म्हणून विविधप्रकारचा भाजीपाला पिकवत आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वसई-विरार महानगर पालिका ही खूप जवळ असल्याने शेतमाल शेतकरी महानगरपालिकेच्या मंडईत विकू शकतील. ही बाब शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायक ठरणार असल्याने महापौरानी स्वत: पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा बाजारपेठे साठी जागा वसई-नालासोपारा-विरार या तिन्ही शहरांत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अध्यक्ष सचिन भोईर, उपाध्यक्ष अमोल सांबरे, कार्याध्यक्ष डॉ.सिद्धार्थ सांबरे व सचिव रूपेश पाटील यांनी महापौरांकड ेनिवेदनाद्वारे ेकेली.