हुसेन मेमन / जव्हारजव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या आदिवासी तालुक्यात यंदा भाताचे पीक मोठ्याप्रमाणात येण्याीच चिन्हे असून भाताची शेते लोंब्यांनी लगडल्याने सोनेरी झाली आहेत. हिरवे शिवार पिवळ्या सोन्यासारखे चमकू लागले असून लवकरच कापणीला सुरुवात होणार आहे. मात्र, आॅक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यत पडत असलेल्या परतीच्या पावसाने खोलगट भागात पाणी साचल्याने तसेच वादळी पावसामुळे भातशेतीचे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नुकसानही झाल्याचे शेतकऱ्यांनी सागितले. खरीपाच्या हंगामात पिकांच्या वाढीच्या व फुटवे येण्याच्या वेळी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात मान्सूनने चांगली साथ दिल्यामुळे भात पिकात दाणा भरला आहे. नवरात्रीच्या आगमनाच्या वेळेसच शिवारातील शेती लोंबल्याने फुलली गेली आहे. हळवी पिकांच्या कापणीला सुरवात झाली असून निमगरवी पिके तयार होण्याच्या अवस्थेत असून, गरवी पिके पोटरीपर्यंत आहेत. लोंबीतील दाणे भरणी उत्तम आहे. (वार्ताहर)जव्हार तालुक्यात नागली, वरई, भात हे प्रामुख्याने पिक घेतले जाते. त्यात सर्वात जास्त लागवड भात पिकाची करण्यात येते, ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी कमी आहेत असे शेतकरी लागवडीचा भात स्वत:साठी ठेवतात. तर ज्यांचे पिक जास्त निघते ते बाजारपेठेत येऊन विक्री करतात.- रवी खुरकुटे, शेतकरी, हेदीचापाडा या वर्षी पावसाचा जोर चारीही महिने होता. त्यामुळे पाण्याची कुठेही कमतरता भासली नाही. शेतात भात पिक चांगले आलेले आहे. परंतु मध्येच अचानक वादळी पाऊस पडल्याने काही प्रमाणात भात शेतीचे नुकसानही झाले आहे. -संदिप साळवे, शेतकी तज्ञ
चार तालुक्यात पिकले सोने
By admin | Updated: October 12, 2016 03:56 IST