पारोळ : वसई तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. शुक्रवार शेवटचा प्रचाराचा दिवस असल्यामुळे राजकीय पक्षांनी गावातच पायी वा दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते.या ११ ग्रामपंचायतींमध्ये बहुजन विकास आघाडी, जनअांदोलन, शिवसेना, भाजपा या पक्षांनी आपले उमेदवार उतरवले आहेत. प्रत्येक पक्षाने जोरदार निवडणुकीची रणधुमाळी माजवली. गावातील मतदार दिवसा कामानिमित्त बाहेर असल्यामुळे रात्रीच प्रचार फेऱ्या होत. आजपासून प्रचार यंत्रणा थंड झाल्याने या ग्रामपंचायतीमध्ये दोन दिवस छुपा प्रचारात रंगात येणर आहे.तालुक्यात शहरीकरण झाल्याने वसई पूर्व भागात कंपन्या, रिसॉटर््स, फार्महाऊस गावोगावी उभी राहत असल्याने या भागातील माजिवली, खानिवडे, उसगाव, शिरवली, मेढे, भिनार या गावांत महसूलमध्ये वाढ झाली. खानिवडे, आडणे गावांत बहुजन विकास आघाडीतच बंड झाल्याने दोन्ही बहुआचेच उमेदवार समोरासमोर उभे आहेत. त्यामुळे या गावातील निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या गावांमध्ये कुणबी, आगरी, आदिवासी, बौद्ध समाजाचे मतदार भरपूर असून बहुतेक गावांत सरपंचपद हे आदिवासी समाजासाठी राखीव आहे. (वार्ताहर) शेवटच्या दिवशी प्रचाराची रणधुमाळीतलासरी तालुक्यात १७ एप्रिलला १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून शुक्रवारी शेवटच्या दिवशी तलासरी तालुक्यात सर्वच पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली.तलासरी तालुक्यात ग्रामपंचायतींच्या चौरंगी ते पंचरंगी निवडणुका होत असून भाजपा, माकपा व राष्ट्रवादी सर्व ग्रामपंचायतींच्या जागा लढवत असून बहुजन विकास आघाडी, मनसे, काँग्रेस काही ठिकाणीच निवडणुका लढवत आहेत. परंतु, तालुक्यात खरी लढत भाजपा, माकपा व राष्ट्रवादीतच होणार असल्याने कोण बाजी मारतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.शेवटच्या दिवशी भाजपा आणि माकपानेही मोटारसायकल रॅली काढली, तर राष्ट्रवादीनेही रॅली काढून जनसंपर्क वाढवला.मध्यंतरीच्या काळात थंडावलेला प्रचार शेवटच्या दिवशी शिगेला पोहोचला.
जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या
By admin | Updated: April 16, 2016 00:46 IST