शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेडमधील अतिक्रमणांवर कारवाईऐवजी बेकायदा विक्री व्यवहाराला संरक्षणाचा घाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:13 IST

मालमत्ताकर हस्तांतराचा आजच्या महासभेत प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : सरकारी जागेतील कांदळवन, सीआरझेडमधील अतिक्रमणांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करून संरक्षण देणाऱ्या मीरा भाईंदर महापालिका व नगरसेवकांनी आता न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांच्या बेकायदा विक्री व्यवहारालाही संरक्षण देण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी बेकायदा बांधकामांना आकारलेल्या मालमत्ताकराचे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव उद्याच्या महासभेत आणला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवन, सीआरझेड क्षेत्रातील बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश दिले असून, कायदे, नियमातील तरतुदी गुंडाळून या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांना अर्थपूर्ण संरक्षण महापालिका व स्थानिक नगरसेवक देत आले आहेत. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासह सरकारी जमिनी माफियांनी बळकावण्यास महापालिका व स्थानिक नगरसेवकांचेही लागेबांधे उघड झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन सातत्याने महापालिका करत असताना आता तर सरकारी जागेतील कांदळवन, सीआरझेडमधील बेकायदा बांधकामांच्या मालमत्ता हस्तांतरणाचा प्रस्ताव महासभेत आणला आहे. सरकारी जागेतील झोपडपट्टीतील मालमत्ता हस्तांतरासाठी चार हजार व सहा हजार रुपये शुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे.वास्तविक कांदळवन, सीआरझेडमध्ये सरकारी जागेतील बेकायदा बांधकामांची खरेदी-विक्री ही कायद्याने करता येत नाही. जेणेकरून असे बेकायदा व्यवहार कायद्यानुसार नोंदणीकृत नसतात. सरकारी जमिनींची खरेदी-विक्री कायद्याने गुन्हा ठरते. त्यातच लोकसेवा हक्क अधिनियमातही मालमत्ता हस्तांतरणाबाबत नियम व अटी दिलेल्या आहेत. महसूल विभागानेही महापालिकेस सरकारी जमिनीवरील कर आकारणी करू नये असे वेळोवेळी निर्देश दिले आहेत; परंतु या सर्वांचे उल्लंघन करून सरकारी जमिनी व त्यावरील बेकायदा बांधकामांची खरेदी-विक्री करणाऱ्यांना संरक्षण देण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. यातून दलालांचेही फावणार आहे. यावर काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.