शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांवर अन्यायकारक दरवाढीचा प्रस्ताव, नागरिक नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 01:00 IST

आधीच महागाई आणि त्यात आता महावितरण विभागाने केलेल्या अन्यायकारक दरवाढीमुळे ग्राहकांवर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे.

पालघर : येत्या पाच वर्षांत वीज ग्राहकांवर ६० हजार ३१३ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार देणारा तसेच सरासरी २०.०४ टक्के अन्यायकारक दरवाढ लादणारा प्रस्ताव वीज महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. महाराष्ट्रातील वीज दरवाढ ही इतर राज्यातील वीज दरापेक्षा जास्त आहे. या दरवाढीविरोधात कायदेशीर लढा उभारण्यासाठी पालघर येथील महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने ग्राहकांच्या सह्यांची मोहीम राबवली. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आधीच महागाई आणि त्यात आता महावितरण विभागाने केलेल्या अन्यायकारक दरवाढीमुळे ग्राहकांवर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे नव्याने आलेल्या सरकारने तत्काळ या प्रस्तावित वीजदरवाढी-विरोधात हस्तक्षेप करत फेरविचार करून निर्णय घेण्यासाठी हा संपूर्ण प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी मागणीही या निमित्ताने वीज ग्राहक संघटनेच्या पालघर शाखेने सही मोहिमेच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. वीज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे अध्यक्ष प्रकाश लवेकर यांनी मुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्र्यांना देण्यासाठीचे निवेदन पालघरचे अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्याकडे सुपूर्द केले.

या वेळी संघटनेचे कार्यवाह निखिल मेस्त्री, सुभाष मोरे, अरविंद पाटील आदी उपस्थित होते. नवीन प्रस्तावित २०.०४ टक्के ही वीज दरवाढ शेती पंप, सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहक, तसेच अन्य वीज ग्राहक आणि औद्योगिक वीज ग्राहक यांचे कंबरडे मोडणारे आहे. महा वीजनिर्मिती, परिवहन आणि वितरण या वीज कंपनीच्या कारभारात कार्यक्षमता आणून वीज गळती, वीज चोरी व भ्रष्टाचार यावर नियंत्रण आणून उत्पन्नात वाढ करण्याचा मार्ग अवलंबणे अपेक्षित असताना वीज दरवाढ करून सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या या निर्णयाविरोधात ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.प्रस्ताव रद्द करा...प्रचंड दरवाढीचा बोजा लादणारा असा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मागे घेणे हेच ग्राहकांच्या व राज्याच्या हिताचे ठरणार आहे. यासाठी राज्य शासनाने वेळीच पावले उचलून हा दरवाढीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी जोर धरत आहे. या मोहिमेत संघटनेचे विद्याधर ठाकूर, चंद्रकांत साखरे, राजू मौर्य, रंगराव गढरी आदी उपस्थित होते.

टॅग्स :palgharपालघर