शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

झापच्या दारुबंदीला घटस्थापनेचा मुहूर्त, बचत गटातील महिलांसह ग्रामस्थांचा मोठा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:15 IST

तालुक्यातील झाप गावातील ग्रामस्थांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर दारू ओतून व नारळ फोडून दारूबंदीचा निर्धार केला आहे. यात बचत गटातील महिलांचा मोठा सहभाग आहे.

हुसेन मेमनजव्हार : तालुक्यातील झाप गावातील ग्रामस्थांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर दारू ओतून व नारळ फोडून दारूबंदीचा निर्धार केला आहे. यात बचत गटातील महिलांचा मोठा सहभाग आहे.तालुक्यातील झाप ग्रामपंचायत हद्दीत दारूचे व्यसन वाढले होते. दमण दारू व गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात होती. ही ग्रामपंचायत शंभर टक्के आदिवासी आहे. अनेकजण दारूच्या व्यसनाधीन झाल्याने त्यांची कुटुंबे देखील उध्वस्त झाली होती, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील दारू विक्रीला आळा बसावा म्हणून, आदिवासी महिला बचत गटांनी पुढाकार घेवून दारूबंदीचा निर्णय घेतला आहे.या ग्रामपंचायत हद्दीत झाप, धंडपाडा, वाघेचीवाडी, चिंचवाडी, भोकरीपाडा, नावापाडा, हेदोली, दळणेचापाडा, वडपाडा असे ९ गाव पाडे असून, या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३ हजार ४५० आहे. मात्र दारूचीबंदी असतांनाही झाप ग्रामपंचायतीत दिवसेंदिवस दारू विक्रीचे व दारू पिणा-यांचे प्रमाण वाढत चालले होते. अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले होते. त्यातच वाद, भांडणे व्हायची. यामुळे ग्रामस्थांनी दारू बंदीचा निर्णय घेतला आहे.झाप ग्रामपंचायत हद्दीत दमण दारूची व हातभट्टीची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे येथील महिलांनी सांगितले. तसेच वाद, भाडंण, तंटे रोजच व्हायची याचा त्रास महिला व मुला बाळांना व्हायचा हे लक्षात घेवून, या ग्रामपंचायतीत महिला एकत्र येऊन दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संपूर्ण गावकरी स्वेच्छेने राबविणार आहे. तसेच जो कोणी ही बंदी मोडेल, त्याला अनुरुप अशी शिक्षाही केली जाणार आहे. आता त्याची अंमलबजावणी कशी होते. याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.