शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वसईमध्ये लेडिज बारवर छापा

By admin | Updated: June 14, 2016 00:26 IST

वसईत नव्यानेच स्थापन झालेल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेने नवघर-माणिकपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरु असलेल्या हॉटेल पॅलेस आणि हॉटेल अंजलीवर

वसई : वसईत नव्यानेच स्थापन झालेल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेने नवघर-माणिकपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरु असलेल्या हॉटेल पॅलेस आणि हॉटेल अंजलीवर धाड टाकून त्या ठिकाणी फ्री सर्व्हिस आणि लेडीज आॅर्केस्ट्राच्या नावाखाली बारबाला करीत असलेल्या अश्लिल कृत्याचा पर्दा फाश केला. यावेळी १८ बारबालांना ताब्यात घेण्यात आले. अंबाडी रोड येथे पॅलेस आणि रेल्वे स्टेशननजिक असलेल्या अंजली या दोन लेडीज बारमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून लेडीज आॅर्केस्ट्रा सुरु आहे. दोन्ही बार लेडीज फ्री सर्व्हिससाठी वसईत प्रसिद्ध आहेत. फ्री सर्व्हीसच्या नावाखाली याठिकाणी बारबाला अश्लिल कृत्य करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती पाटील यांनी आपल्या पथकासह साध्या वेशात ग्राहक बनून काल रात्री दहाच्या सुमारास सापळा रचला होता.या दोन्ही बारमध्ये एकाच वेळी छापा टाकण्यात आला. यावेळी बारबाला अश्लिल चाळे करीत असल्याचे आढळून आले. यावेळी १८ बारबालांना ताब्यात घेऊन त्यांचवर बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट ११० अन्वे कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शिरसाट, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भगत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांच्या पथकात समावेश होता. (प्रतिनिधी)अपहरण व बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलेतालुक्यात अपहरण, अल्पवयीन मुले-मुली यासह मोठी माणसे बेपत्ता होण्याच्या घटनांंमध्ये वाढ झाल्याचे लक्षात घेऊन नुकतीच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखा सुुरु करण्यात आलेली आहे. गेल्या पाच महिन्यात वसई तालुक्यातून ३४ लहान मुले आणि ४५१ मोठी माणसे हरवलेली आहेत. अपहरणाच्या ७५ तक्रारी दाखल आहेत. शाखा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी एका अल्पवीन मुलाचा शोध घेण्यात यश मिळवले होते. हा मुलगा पुणे येथील बालगृहात नाव बदलून राहत होता. सध्या अशा दहा केसेसचा तपास शाखेकडे सोपवण्यात आला आहे. वसईच्या शाखेत दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई, एक पोलीस हवालदार असा कर्मचारी वर्ग देण्यात आलेला आहे.