शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

बाप्पांच्या निरोपासाठी सज्जता, ३२०० पोलीस आणि जवान तैनात : ध्वनिप्रदूषण टाळा, वाहतुकीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 2:31 AM

अनंत चतुर्दर्शी च्या मुहूर्तावर जिल्ह्यातील सार्वजनिक ५७५ तर खाजगी ४ हजार ४७१ गणपतीच्या मूर्त्यांचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले असून कुठलाही अनुचित प्रकार न घडता उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन पार

पालघर : अनंत चतुर्दर्शी च्या मुहूर्तावर जिल्ह्यातील सार्वजनिक ५७५ तर खाजगी ४ हजार ४७१ गणपतीच्या मूर्त्यांचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले असून कुठलाही अनुचित प्रकार न घडता उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन पार पडावा ह्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अधीक्षकांनी ३ हजार २०० पोलीस, अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व सुरक्षाबलाचे जवान तैनात केले आहेत.पालघर जिल्ह्यात २५ आॅगस्ट पासून २१ दिवसापर्यंतच्या गणेशोत्सवाची धूम सुरु असून जिल्ह्यात सार्वजनिक ३५ हजार ३२३ तर खाजगी २ हजार ७६० अशा एकूण ३८ हजार ०८३ मूर्त्यांची स्थापना करण्यात आली होती. पालघर तालुक्यात सार्वजनिक १०० मूर्त्यांंचे तर खाजगी २८४ मूर्त्यांचे विसर्जन उद्या करण्यात येणार आहे. डहाणू तालुक्यात सार्वजनिक ४२ मूर्त्यां तर खाजगी २० मूर्त्यां, तलासरी तालुक्यात सार्वजनिक ७ मूर्त्यां , जव्हार तालुक्यात सार्वजनिक ४२ तर खाजगी ९० मूर्त्यां, मोखाडा तालुक्यात सार्वजनिक ४४ तर खाजगी ८३ मूर्त्यां, विक्र मगड तालुक्यात सार्वजनिक १३ तर खाजगी ६ मूर्त्यां, वाडा तालुक्यात सार्वजनिक ३८ तर खाजगी ३५ मूर्त्यां तर वसई तालुक्यात सर्वाधिक सार्वजनिक २८९ तर खाजगी ३ हजार ९५३ मूर्त्यांंचे विसर्जन मंगळवारी करण्यात येणार आहे. तर २१ दिवसाच्या दोन गणेश मूर्त्यांंची स्थापनाही वसई तालुक्यातील वालीव आणि विरार पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील एकूण सार्वजनिक २ हजार ७६० गणपती मूर्त्यां पैकी एकट्या वसई तालुक्यात ८३५ मूर्त्यां तर खाजगी ३५ हजार ३२३ मूर्त्यां पैकी २७ हजार ५०२ मूर्त्यां ची स्थापना करण्यात आलेली होती.जिल्ह्यात महानगर पालिका, नगर पालिकांकडून विसर्जनाच्या ठिकाणी स्वयंसेवक, स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने मदतकार्य केले जाते. पालघर शहरात गणेश मंडळे, खाजगी कुटुंबे ह्यांच्या स्वागतासाठी अनेक राजकीय पक्षाकडून मोठमोठे मंडप घातले जातात. त्यांना स्मृतीचिन्हे देऊन त्यांचे स्वागत केले जाते. पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थाचे विनामूल्य वाटप केले जाते.सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या सतर्कतेच्या इशाºया नंतर उद्याच्या विसर्जना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे स्वत: जातीने लक्ष पुरवीत आहेत. दोन अप्पर पोलीस अधीक्षकांच्या सहकार्याने सात उपविभागीय पोलीस अधिकारी, १४३ पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक, २ हजार ५५७ पोलीस कर्मचारी, ३५० होमगार्ड व सुरक्षा बलाच्या टीम ची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय जीवरक्षक जवान, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, खोल समुद्रात विसर्जनासाठी गणेशमूर्ती नेण्याकरीता मोफत नौका,विसर्जनस्थळी हॅलोजन दिव्यांची सुविधा, अग्निशमन दलाची सज्जता आदी बाबीही करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन