शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधून पडलेल्या महिलेचे वाचले प्राण,  रेल्वे स्टेशनमधील घटना सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 05:43 IST

धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरून पडल्याने प्लॅटफार्म आणि लोकल ट्रेनच्यामध्ये फरफटत जात असलेल्या एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवण्याचे काम आरपीएफच्या एका अधिका-याने केले.

वसई : धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरून पडल्याने प्लॅटफार्म आणि लोकल ट्रेनच्यामध्ये फरफटत जात असलेल्या एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवण्याचे काम आरपीएफच्या एका अधिकाºयाने केले. महिलेला मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बाहेर काढतानाची दृश्ये रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.लता महेश्वरी असे महिला प्रवाशाचे नाव असून गोपाळकृष्ण राय असे तिला वाचवणाºया कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर घडली. आदल्या रात्री विरार रेल्वे स्टेशनमध्ये पैशांसाठी एका तरुण महिला प्रवाशाला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलले गेल्याचा प्रकार ताजा असतानाच दुसºया दिवशी मात्र नालासोपाºयात एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवण्याचे काम आरपीएफच्या पोलीस अधिकाºयाने केले. बोरीवली येथील महेश्वरी आपल्या मुलीसोबत नालासोपाºयाहून बोरीवलीला निघाल्या होत्या. मुलगी लोकलमध्ये चढली. मात्र, महेश्वरी लोकल गाडी सुरु झाल्यानंतर चढण्याचा प्रयत्न करीत असताना पाय घसरून गाडीसोबत फरफटत जाऊ लागल्या. गाडीने वेग घेतल्यानंतर त्या प्लॅटफार्म आणि गाडीच्या मध्ये सापडल्या होत्या. प्लॅटफार्मवर असलेले प्रवाशी जीवन-मरणाचा हा खेळ पहात जागीच स्तंभ झाले होते. पण, रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या राय यांनी मात्र बघ्याची भूमिका न घेता प्रसंगावधान साधून महेश्वरी यांना वाचवण्यासाठी धाव घेतली.मृत्यूच्या मुखातून बाहेरगाडीने वेग पकडलेला आणि महेश्वरी अक्षरश: मृत्युच्या दाढेत लोटल्या जात असताना राय यांनी हिंमत दाखवून महेश्वरी यांना खेचून बाहेर काढले. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने महेश्वरी यांना सुखरुप बाजूला करण्यात आले. महेश्वरी अक्षरश: मृत्युच्या जबड्यातून बाहेर पडल्या होत्या. हा थरार स्टेशनवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. महेश्वरी या अपघातात किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना मानसिक धक्काही बसला आहे.