शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत पाटलांचा उद्या भाजपाप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:46 IST

बहुजन विकास आघाडीत कार्यरत अनेक लोकोपयोगी कार्यानी तो आपल्या पक्षाला बळकटी देण्याचा प्रामाणकि प्रयत्न करीत अ

हितेंन नाईक पालघर : बहुजन विकास आघाडीत कार्यरत अनेक लोकोपयोगी कार्यानी तो आपल्या पक्षाला बळकटी देण्याचा प्रामाणकि प्रयत्न करीत असतांना पद्धतशीरपणे पंख छाटले गेल्याने व अनेक वर्षांपासून होत असलेली घुसमट असह्य झाल्याने शेवटी बविआ चे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील ह्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व १४ मे रोजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पालघर मध्ये त्यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे.तालुक्यातील राजकारणात ज्या बहुजन विकास आघाडी चे नाव तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील ह्या नावा भोवती फिरत राहिले होते. त्यानी ८ महिन्यांपूर्वी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आले होते. आपल्या अनेक लोकोपयोगी कार्यांनी ते बविआला बळकटी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे पंख छाटले गेल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा शहरात सुरु होती.वसई तालुका सोडला तर इतर तालुक्यात बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला सहजा सहजी इथला मतदार स्वीकारायला तयार नसल्याचे अनेक निवडणुकांच्या निकालावरून दिसून आले आहे. बोईसर मतदार संघातून निवडून येणारे आमदार विलास तरे ह्यांच्या विधानसभा क्षेत्रात वसई तालुक्यातील एक भाग येत असला तरी प्रशांत पाटलांनी ग्रामीण भागात बांधलेली मतदारांची मोट आणि आपल्या कुणबी समाजातील मतदारांना बहुजन आघाडीशी बांधून ठेवण्याचे कसब त्यांनी दाखवून दिले होते. त्यामुळे आमदार विलास तरे ह्यांच्या विजयासह जिल्हापरिषद, पंचायत समित्या आणि अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकात तालुकाध्यक्ष पाटील यांच्या कर्तृत्वाचाही वाटा असल्याचे कोणी नाकारू शकणार नाही. तालुक्यातील कोणात्याही समाजाच्या सुख-दु:खात सहभागी होत आम्ही तुमच्या सोबत आहोत ही दाखविलेली आपुलकी त्याच्या व पक्षाच्या वाढी साठी अनेक वेळा फायदेशीर ठरलेली होती.