शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिज्ञापत्र सादर करीत नाहीत, तोपर्यंत वसई-विरार महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:41 IST

Vasai-Virar Municipal Corporation election News : दोन वेळा सांगूनही राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने अखेर उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही, तोपर्यंत वसई-विरार महापालिकेची निवडणूक प्रकिया राबविण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

वसई : राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही, तोपर्यंत वसई-विरार शहर महानगरपालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीची एकूणच प्रकिया राबविण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणी २९ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली.समीर वर्तक यांनी वसई-विरार महापालिका प्रशासन तथा निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचनेबाबत दोष, त्रुटी व काही सूचनाही केल्या होत्या, मात्र निवडणूक आयोगाने १७ पैकी केवळ एकच हरकत मान्य करीत इतर सर्वच्या सर्व हरकती फेटाळून लावल्याने वर्तक यांनी महापालिकेसह राज्य निवडणूक आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. उच्च न्यायालयात पहिली सुनावणी दि. १५ ऑक्टोबरला, दुसरी सुनावणी दि. २२ ऑक्टोबरला पार पडली, मात्र दोन्ही वेळी राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी गैरहजर राहिले, किंबहुना निवडणूक आयोगाने आमची प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे सांगितले, तर नंतर आम्हाला नोटीसच मिळाल्या नाहीत, असा युक्तिवाद केला, मात्र याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी सर्व प्रतिवादींना नोटिसा ई-मेलद्वारे पाठवल्याचे पुराव्यासह उच्च न्यायालयात स्पष्ट केले.  

दोन वेळा सांगूनही  प्रतिज्ञापत्र सादर नाही दोन वेळा सांगूनही राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने अखेर उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही, तोपर्यंत वसई-विरार महापालिकेची निवडणूक प्रकिया राबविण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूकCourtन्यायालय