शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गवराईपाड्यातील पोस्ट आॅफिस व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:14 IST

औद्योगिक वसाहतीसह तब्बल दहा गावांना सेवा देणाºया गवराई पाडा पोस्ट आॅफिसच्या इमारतीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

शशी करपेवसई : औद्योगिक वसाहतीसह तब्बल दहा गावांना सेवा देणाºया गवराई पाडा पोस्ट आॅफिसच्या इमारतीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. मोडकळीस असलेल्या इमारतीत कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. तर नागरीकांना कार्यालयात जाण्याचीही भीती वाटत आहे.गवराईपाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून एका पडक्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे पोस्ट आॅफिस सुरु आहे. ही इमारत अगदी जीर्ण झाली आहे. पहिल्या मजल्याचे सुरक्षा कठडे गायब झाले आहेत. ते नसल्याने येता-जातांना भीती वाटते. खिडक्याही तुटलेल्या आहेत. सिलिंगचा स्लॅब कोसळलेला आहे. जिन्याच्या पायºया तुटलेल्या आहेत. इमारतीचे प्लॅस्टर निखळून पडलेले आहे. त्यातून गंजलेल्या शिगा बाहेर डोकावतांना दिसतात. इमारतीचे पीलरही कमकुवत झाले आहेत. इमारतीच्या चोहोबाजूला उगवलेले गवत आणि वाढलेल्या झाडाझुडूपांमुळे हे पोस्ट आॅफिस की भूत बंगला असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. जीर्ण अवस्थेमुळे येथील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. या पोस्ट आॅफिसमधून वसईतील मोठ्या औद्योगिक वसाहतीसह गवराईपाडा, गोखीवरे, कामण, ससूनवघर, राजावली, पेल्हार, जुचंद्र, सातीवली, वालीव परिसरात सेवा दिली जाते. शासकीय कागदपत्रांसह खाजगी टपाल आजही पोस्ट आॅफिसमधूनच पाठविले जाते. त्यासाठी या टपाल कार्यालयात एक पोस्ट मास्तर, दोन शिपाई, एक सहाय्यक, पंधरा पोस्टमन, आठ ब्रँच पोस्टमन कार्यरत आहेत. मोठ्या औद्योगिक वसाहतीमुळे याठिकाणी नेहमी मोठी वर्दळ असते. या पोस्टात सर्वसामान्यांनी केलेल्या मोठ्या गुंतवणूकीचे रेकॉर्ड ठेवलेले आहे. त्याचीही सुरक्षा धोक्यात आलेली आहे. अनेकदा पोस्टात मोठी रोकडही ठेवलेली असते. तिच्या सुरक्षेबाबतही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.इमारतीच्या दुरुस्तीसाठी कर्मचाºयांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. पण, कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अपघात होऊन मनुष्यहानी झाल्यानंतरच इमारतीची दुरुस्ती करणार का असा सवाल येथील कर्मचारी व पोस्टाचे ग्राहक करीत आहेत.