शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सेवेवरून रंगले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:13 IST

अखेर वसई-विरार महापालिकेच्या बससेवेला सुरुवात : प्रवाशांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : कोरोनाकाळापासून बंद असलेली वसई-विरार शहर महानगरपालिकेची परिवहन बससेवा अखेर १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही बससेवा मेसर्स एसएनएन कंपनीमार्फत सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नवीन वर्षात वसईकरांना भेट दिली आहे, मात्र त्याच वेळी भाजपनेही आम्ही केलेल्या मागणीमुळेच परिवहन सेवा सुरू झाल्याचा दावा केला असून आगामी  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकारण रंगू लागले आहे.वसई-विरार शहर महागरपालिकेच्या मुख्य कार्यालय येथे परिवहन बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी सभापती प्रभाग ‘क’चे यज्ञेश्वर पाटील, माजी सभापती प्रभाग ‘ब’चे चिरायू चौधरी, माजी महिला बालकल्याण सभापती माया चौधरी, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, माजी नगरसेविका ममता सुमन, रंजना थलेकर, माजी परिवहन समिती सदस्य कल्पक पाटील, वसंत वरे, स्वप्निल कवळी व महानगरपालिका अधिकारी वर्ग, परिवहन सेवा कर्मचारी उपस्थित होते.नालासोपारा, वसई येथेही परिवहन सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सध्या ९१ बस परिवहन सेवेच्या ताफ्यात आल्या असून, या बसेस ४३ मार्गांवर चालू करण्यात येणार आहेत. तसेच वाढीव मार्गांवर टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या परिवहन सेवेमार्फत वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अपंग व वैद्यकीयदृष्ट्या गरजू नागरिकांना परिवहन सेवेच्या सवलती लागू होतील व त्या यापुढेही मिळणार असल्याचे मनपातर्फे सांगण्यात आले आहे.आंदोलनामुळेच निर्णय झाल्याचा भाजपचा दावा वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने परिवहनची सेवा सुरू झाल्याबरोबरच राजकारणाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या दिवशी मनपाने परिवहन सुरू केल्याबरोबर आमच्या आंदोलनामुळे ही सेवा सुरू झाल्याचा दावा भाजपने केला आहे. आयुक्तांना भेटून दिलेल्या निवेदनांमुळे ही परिवहन सेवा सुरू झाल्याचेही भाजपने म्हटले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार