शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी नागरिकांची माहिती न दिल्यास पोलीस करणार कारवाई 

By धीरज परब | Updated: February 29, 2024 20:21 IST

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक परदेशी नागरीक येतात आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध आस्थापनांमध्ये वास्तव्य करतात.

मीरारोड- भाईंदरच्या चौक जेट्टी येथे म्यानमार देशातील ८ रोहिंगे सापडल्याने खळबळ उडाली असून मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांनी परदेशी नागरिकांना आश्रय व सुविधा देण्यास १ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान मनाई आदेश लागू केला आहे. तसेच त्यांची माहिती न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बांग्लादेशी व नायजेरियन नागरिक बेकायदा वास्तव्य करताना तसेच अमली पदार्थ आदींचा व्यवसाय करताना आढळून येत असतात. परंतु भाईंदरच्या चौक जेट्टी येथे म्यानमार देशातील ८ रोहिंगे हे उघड्यावर मस्तपणे गप्पा मारताना आढळून आल्या नंतर खळबळ उडाली.

लोकमतने याबाबत गुरुवारी बातमी दिल्यावर मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने मनाई आदेश जारी केला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक परदेशी नागरीक येतात आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध आस्थापनांमध्ये वास्तव्य करतात.  यामुळे काही असामाजिक तत्वांना मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत त्यांची ओळख आणि उपस्थिती लपवुन राहण्याची संधी प्राप्त होते. त्यावर आळा घालणेकामी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पारित केला आहे . 

आदेशानुसार बोर्डिंग हाऊस, क्लब, विश्रामगृहे (खासगी कंपनीचे विश्रामगृहांसह), पेयींग गेस्ट हाऊस, होम स्टे सुविधा, भाडेतत्वावर मिळणारी निवासस्थाने, घरे , सदनिका , बंगले, चाळ इत्यादी ठिकाणी परदेशी नागरिक वास्तव्यास आल्यास २४ तासांच्या आत पोलिसांना त्याची माहिती मालक - चालकांनी द्यायची आहे. 

तसेच रुग्णालये, दवाखाने, दुकाने , उपहारगृहे, सराई आणि जहाज व बोटी आदी आस्थापनां मध्ये परदेशी नागरिक आल्यास त्याची माहिती सुद्धा संबंधित चालक - मालक , व्यवस्थापक यांना नजीकच्या पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक करण्यात आले आहे . सदर आस्थापणांमध्ये सध्या परदेशी नागरीक वास्तव्यास असल्यास त्याची माहिती सदरचा मनाई आदेश पारित झाल्यापासुन २४ तासाच्या आत पोलीसांना द्यावा लागणार आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे व इतर संबंधित कायदयांप्रमाणे कायदेशीर कारवाई आणि शिक्षेस पात्र ठरणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड