शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पोलिसांची जागा भूमाफियांनी लाटली, तुळींज पोलीस ठाणे हद्दीतला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:28 IST

तुळींज पोलीस ठाणे गटारावर असल्याची नोटीस बजावणा-या वसई विरार महापालिकेने पोलिसांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर बोगस कागदपत्रांद्वारे इमारत बांधणा-या विकासकांवर अद्याप कारवाई केली नसल्याची माहिती उजेडात आली आहे.

शशी करपे वसई: तुळींज पोलीस ठाणे गटारावर असल्याची नोटीस बजावणा-या वसई विरार महापालिकेने पोलिसांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर बोगस कागदपत्रांद्वारे इमारत बांधणा-या विकासकांवर अद्याप कारवाई केली नसल्याची माहिती उजेडात आली आहे. या प्रकरणी महापालिकेच्याच उपसंचालकांनी कारवाईची शिफारस केली असतानाही सहाय्यक आयुक्तांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे.नालासोपारा येथील मौजे समेळ पाडा येथील सर्व्हे क्रमांक ४९, हिस्सा नंबर १३ हा भूखंड महापालिकेच्या विकास आराखड्यात पोलीस ठाण्यासाठी राखीव दाखवण्यात आला आहे. मात्र, विकासक जितेंद्र गोविंद पुजारी, सचिन वझे, निलेश ठाकूर आणि दिलीप रामचंद्र आंबवकर यांनी या भूखंडावर अतिक्रमण करून त्याजागी निवासी इमारत बांधून त्यातील प्लॅट विकून टाकले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विकसकांनी अनधिकृत इमारत बांधल्यानंतर फ्लॅटधारकांना कर्ज मिळवून देण्यासाठी बोगस बांधकाम परवानगी आणि अकृषक दाखल्याचा वापर केला आहे. याप्रकरणी भाजपाचे वॉर्ड क्रमांक ५६ चे युवा अध्यक्ष डेरीक डाबरे यांनी महापालिकेकडे ७ जून २०१७ ला तक्रारही केलेली आहे.बांधकाम परवानगीच्या प्रती या कार्यालयातील नसल्याचे दिसून येते. तसेच बीपी-४५४२ या क्रमांकाची बांधकाम परवानगीसाठी मौजे- मालोंडे येथील जागेसाठी अर्ज केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर बांधकाम परवानगीची प्रत बनावट असल्याचे स्पष्ट होते. तरी सदर अनधिकृत बांधकामावर एमआरटीपी अ‍ॅक्ट १९६६ अन्वये व बनावट कागदपत्र याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे, असे उपसंचालकांनी सहाय्यक आयुक्त जाधव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. उपसंचालकांनी दिलेल्या अहवालाला तीन महिने होत आले असतानाही जाधव अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार डाबरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे.दरम्यान, नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्याला स्वत:ची जागा नाही. डाबरे यांच्या तक्रारीवरून महापालिकेच्या नगररचना विभागाने तपासणी केली असता सदर इमारत अनधिकृत असून बोगस कागदपत्रे तयार केल्याचे उजेडात आले. त्यानंतर नगररचना उपसंचालकांनी २३ जून २०१७ ला सहाय्यक आयुक्त प्रकाश जाधव यांना लेखी पत्र देऊन कारवाईची शिफारसही केलेली आहे. इमारत बांधकाम परवानगी दिलेली असल्याचे सिडकोच्या हस्तांतर केलेल्या अभिलेखावरून दिसून येत नाही.