शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निचऱ्यासाठी पोलिसांचा पुढाकार

By admin | Updated: July 6, 2017 05:48 IST

मुंबई-अहमदाबाद हायवेवर पाणी साचून राहत असल्याने वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय करण्यासाठी

अनिरुद्ध पाटील/लोकमत न्यूज नेटवर्कवसई : मुंबई-अहमदाबाद हायवेवर पाणी साचून राहत असल्याने वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय करण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षकाने पुढाकार घेऊन हायवेवर पाणी वाहून जाण्यासाठी फुटलेला पाईप बदलण्याचे काम केले. त्यामुळे आता पाणी निचरा होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने वाहतूक कोंडीची डोकेदुखी दूह होण्यास मदत होणार आहे.हायवेवर ससूनवघर-मालजीपाडा येथे डोंगरावरून येणारे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकण्यात आले आहेत. तो तुटल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्यापासून याभागात हायवेवर दोन्ही बाजूला प्रचंड पाणी साचून राहू लागले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन दोन्ही बाजूला तब्बल दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागू लागल्या आहेत. याचा परिणाम ठाण्याहून मुंबई आणि मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सहन करावा लागत आहे. पाईप बदलण्याचे काम आयआरबी या कंपनीकडे आहे. मात्र, कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने पाईप बदलण्याचे काम रखडून पडले होते. वसईचे वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी स्वत: कंपनीशी संपर्क साधून सोमवार दुपारपासून पाईप बदलण्याचे काम हाती घेतले.