शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालपदाच्या अर्जासाठी लूट, आदिवासींसाठी ५०० तर ओबीसींसाठी एक हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:26 IST

पालघर जिल्हयातील तालुका पातळीवर कोतवाल पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यासाठी करावयाच्या अर्जासाठी आदिवासी उमेदवारांकडून पाचशे रुपये

वसई : पालघर जिल्हयातील तालुका पातळीवर कोतवाल पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यासाठी करावयाच्या अर्जासाठी आदिवासी उमेदवारांकडून पाचशे रुपये तर इतर मागासवर्गींयासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे.पालघर जिल्हयातील पालघर तालुक्यासाठी १०, वसई तालुक्यासाठी २३, विक्रमगडसाठी ५, जव्हारसाठी ७, मोखाड्यासाठी ३, तलासरीसाठी ९ आणि डहाणूसाठी ८ मिळून एकूण ७५ कोतवाल पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिये द्वारे भरती करण्यात येणार आहे. ७५ पैकी अवघ्या बारा जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर बहुसंख्या जागा अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती महिला, इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव आहेत. यात निवड होणाºया उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने अनेक कुटुंबे आर्थिकदृष्टया दुर्बल गटातील आहेत. याच कुटुंबातील हजारो तरुण-तरुणी कोतवाल पदासाठी अर्ज करणार आहे. मात्र, अर्जासाठी अनुसूचित जमातीसाठी पाचशे रुपये आणि इतर मागासवर्गींयासाठी एक हजार रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. या कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहता अवघे पाच हजार रुपये मानधन मिळणाºया कोतवाल पदासाठी इतके शुल्क आकारणे योग्य नाही, अशी तक्रार शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.