शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसईत महापालिकेच्या वाचनालयाची दुर्दशा

By admin | Updated: June 30, 2017 02:36 IST

वसई विरारमहापालिकेच्या नवघर-माणिकपूर शहरात असलेल्या वाचनालयाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. वाचनालयाची इमारत गळकी

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई विरारमहापालिकेच्या नवघर-माणिकपूर शहरात असलेल्या वाचनालयाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. वाचनालयाची इमारत गळकी असल्याने सांडपाण्याची गळती लागलेली आहे. त्यातच प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. अशा स्थितीत वाचक आणि अभ्यासासाठी येणारे विद्यार्थी वावरत असल्याकडे शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.महाालिकेच्या डॉ. हेडगेवार सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. पुस्तकांसोबत सांडपाणी आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. तळजमला अधिक दोन मजली इमारतीतील शौचालयातील नळांना गळती लागल्याने पाणी थेट तळमजल्यापर्यंत येत आहे. त्यातच छप्पर गळके असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर झिरपून इमारतीत येत आहे. दुसऱ्या मजल्यावरील गळके पाणी आणि शौचालयाच्या दुर्गंधीमुळे संपूर्ण वाचनालयात एक प्रकारचा घाणेरडा असह्य वास पसरून राहिलेला आहे, अशी तक्रार गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केली आहे. वाचनालय इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा साथीच्या आजाराने विद्यार्थी व वाचकांच्या, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी भिती चेंदवणकर यांनी व्यक्त केली आहे.