शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

खेळाचे मैदान लग्न समारंभासाठी; खेळाडूंमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:35 IST

तीन दिवसाची परवानगी असताना १५ दिवस मंडप

नालासोपारा : विरार पश्चिमेकडील आगाशी गावातील पुरापाडा येथे असलेले एकमेव जुने मैदान महानगरपालिकेने लग्न समारंभासाठी भाड्याने दिल्याने तब्बल १५ दिवसांपासून मैदानावर मंडप उभा आहे. तसेच मैदानात तेथे कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे. लग्न सोहळ्यासाठी फक्त तीन दिवसांची लेखी परवानगी मिळालेली असताना तब्बल १५ दिवस हा मंडप कसा काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आणि खेळाडूंना पडला आहे.खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने तयार करून त्यांची चांगली देखभाल ठेवणे आवश्यक असते. पण अशी मैदाने खेळण्यासाठी उपलब्ध न करता ती भाड्याने लग्न सोहळ्यांना कशी काय दिली जातात, असा संतप्त सवाल खेळाडू विचारीत आहेत. पुरापाडा येथील या जुन्या मैदानात व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बॅटमिंटन असे अनेक खेळ खेळले जातात. हे मैदान पावसाळ्यानंतर लायन्स क्लबकडून व्यवस्थित भराव वगैरे टाकून लेव्हल केले जाते.त्यानंतर ५ ते ६ दिवस त्याचे कार्यक्रम याच मैदानावर घेतले जातात. त्यानंतर हे मैदान सर्वांसाठी खुले केले जाते.लायन्स क्लब या मैदानाची देखरेख, साफसफाई करते. मात्र महापालिका याकडे कानाडोळा करत असून खेळाडूंसाठी काहीही व्यवस्था करीत नाही, असा आरोप खेळाडूंकडून केला जात आहे.सदर मैदान मुलांना खेळण्यासाठी असतानाही महापालिका या मैदानाची निगा न राखता लग्न समांरभ व इतर सोहळ्यांसाठी हे मैदान भाड्याने का देते?- संतोष सावंत, खेळाडूयाबाबत कालच महापालिकेच्या कार्यालयात बैठक घेतली असून हे मैदान यापुढे कोणत्याही कामासाठी भाड्याने न देण्याचे ठरवले आहे. ज्याच्या लग्न सोहळ्यामुळे मैदानावर कचºयाचे ढीग झाले होते. त्यांच्या डिपॉझिटमधून साफसफाईसाठी लागलेला खर्च कापला जाणार असून तो कापून परत करण्याचे सहाय्यक आयुक्तांना सांगितले आहे.- सखाराम महाडिक, सभापती,वसई-विरार महापालिका