शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक: कामचुकार स्वच्छता निरीक्षकांना संरक्षण; तर अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले कारवाईचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:34 IST

तक्रारी जास्तच झाल्या किंवा वरिष्ठांनी सांगितले तर तेवढ्या पुरती कारवाई स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्या कडून केली जाते .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - प्लास्टिक पिशव्या आदी वस्तूंवर कायद्याने बंदी असताना देखील त्यास संरक्षण देणाऱ्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकांना पाठीशी घालत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जात नाही. तर आता अतिक्रमण विभागास देखील -प्लास्टिक वर कारवाईची जबाबदारी देण्यात आली आहे . 

 राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्या , चमचे , स्ट्रॉ , ग्लास , डिश अश्या एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातलेली आहे . शिवाय केंद्र सरकारने देखील एकल वापराच्या प्लास्टिक ना मनाई केली आहे . परंतु मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक , मुकादम यांच्या कडून कारवाई केली जात नसल्याने शहरात राजरोसपणे प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर , विक्री सुरु आहे . 

तक्रारी जास्तच झाल्या किंवा वरिष्ठांनी सांगितले तर तेवढ्या पुरती कारवाई स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्या कडून केली जाते . इतकेच काय तर प्लास्टिक पहिल्यांदा आढळल्यास ५ हजार रुपये दंड असताना स्वच्छता निरीक्षक हे केवळ १५० रुपये दंड आकारून प्लास्टिक विक्रेता वा वापरकर्त्याच्या भक्कम आर्थिक फायदा करून देत आले आहेत . 

त्यातूनच प्लास्टिक विक्रेते आणि वापरकर्ते यांच्याशी स्वच्छता निरीक्षक आदींचे अर्थपूर्ण लागेबांधे असल्याचे आरोप सातत्याने होऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे . कारण स्वच्छता निरीक्षक हे प्लास्टिक ची कारवाई असो किंवा माती व डेब्रिस भराव , अस्वच्छता आदी प्रकरणी देखील कारवाई करण्यास नेहमीच जबाबदारी झटकून टाळाटाळ करत आले आहेत . 

काही दिवसां पूर्वीच  बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई न करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई केली जाईल 

असे पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक द्वारे म्हटले होते . परंतु शहरात पहाटे पासून प्लास्टिक पिशव्या सर्रास वापरली जात असताना प्रशासनाने स्वच्छता निरीक्षकावर कारवाईच केली नाही. त्यांना संरक्षण देत उलट आता प्लास्टिक पिशव्यांवर कारवाईची जबाबदारी अतिक्रमण विभागा वर सुद्धा देण्यात आली आहे . 

आयुक्त दिलीप ढोले यांनी आयोजित केलेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत तसे निर्देश दिले आहेत .  तर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्या वर कारवाईच्या सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली आहे . 

अतिक्रमण विभागास जबाबदारी दिली त्याचे स्वागत करत ३ नंतर रात्री पर्यंत प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई होईल अशी आशा आहे . पण पहाटे पासून प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर उघडपणे होत असताना स्वच्छता निरीक्षक आणि मुकादमांना संरक्षण कशाला ? असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत . 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी